थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे, वाढदिवसाला घराबाहेर गर्दी नको!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या येणाऱ्या वाढदिवसानिमीत्त पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत, सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाला भेटण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन केलंय. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे, पक्षाच्या धोरणांविषयी-नव्या कार्यक्रमांविषयी मला बोलायचं आहे…तोपर्यंत जिथे आहात तिथे पूर्ण काळजी घेऊन रहा असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. १४ जून हा मनसे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:35 AM • 11 Jun 2021

follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या येणाऱ्या वाढदिवसानिमीत्त पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत, सध्याची परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसाला भेटण्यासाठी गर्दी करु नका असं आवाहन केलंय. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे, पक्षाच्या धोरणांविषयी-नव्या कार्यक्रमांविषयी मला बोलायचं आहे…तोपर्यंत जिथे आहात तिथे पूर्ण काळजी घेऊन रहा असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

१४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. या दिवशी कृष्णकुंज या निवासस्थानी अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी येत असतात. परंतू सध्या कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती, आजुबाजूची रुग्णसंख्या या परिस्थितीचा अंदाज घेत राज ठाकरेंन कार्यकर्त्यांना आपल्याला भेटण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

गेल्या काही वर्षांतली मनसेची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नाही. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. यानंतर मनसेला ओहोटी लागली. लोकसभा निवडणुकांध्ये पक्षाचं मताधिक्य कमी झालं यानंतर २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीतही मनसेचा एक आमदार निवडून आला. काही दिवसांपूर्वी मनसे-भाजप युतीच्या बातम्या प्रसारमाध्यमांसमोर येत होत्या. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय रणनिती आखतात आणि पक्ष कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp