Supriya Sule On Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण सुरु केलं आहे. विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदारांनी जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जरांगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आझाद मैदानावर जात असताना आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली अन् जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी आत्तापर्यंत आरक्षण का दिलं नाही, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सुळे यांना घेरावही घातला. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी काही संविधानात्मक तरतूद केली पाहिजे, असं स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना दिलं.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या?
सरकारला जर काही करायचं असेल, तर काही अवघड नाही. सर्वच पक्षांचो लोक मनोज जरांगे यांना भेटायला येत आहेत. कोणाचाच विरोध नाहीय. जर कोणाचाच विरोध नसेल, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये तातडीनं निर्णय घ्यावा. काही संविधानात्मक तरतूद करायची झाली, तर त्यांनी तशी बैठक बोलवावी. चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका. यात काय अडचण आहे..आज निर्णय कोणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या की सरकारच्या? सरकारच्या हातात आहे.
हे ही वाचा >> शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत केले अश्लील चाळे, नंतर हॉटेलमध्ये बोलावलं, पालक संतापले अन् नंतर घडलं..
मग सरकारने याची उत्तर दिली पाहिजेत. आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? सगळे पक्ष, घरं फोडून झालंय ना..मग आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आमचे पक्ष फोडले आणि आमची घरं फोडली ना..आता घ्या ना निर्णय..नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर म्हणजे सत्ता नसंतं. मायबाप जनतेच्या सुख दु:खात माणूस असला पाहिजे. त्याला खरा नेता म्हणतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिंदे समितीसोबत चर्चा निष्फळ, जरांगे म्हणाले..
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट तसेच सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी करत आहेत. शिंदे समितीने जरांगे यांनी मराठा गॅझेट शोधण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली पण जरांगे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. 13 महिने मुदत दिली आता आणखी किती मुदत तुम्हाला हवी? असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांनी आमरण उपोषणाचा सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT
