Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव हे मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं यावर ते ठाम आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई तक या डिजिटल प्रसारमाध्यमाने मनोज जरांगेंची 30 ऑगस्ट रोजी मुलाखत घेतली होती. त्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत घणाघात केला. देवेंद्र फडणवीस यांनी दोन खून केलेत’ असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बुध ग्रहाचा केतू नक्षत्रात प्रवेश, काही राशीतील लोकांना पैशाची कमी पडणार नाही, काय सांगतं राशीभविष्य?
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
आरक्षणाचा तोडगा निघेल का? असा सवाल 'मुंबई तक'ने केला असता, त्यावर मनोज जरांगे पाटील उत्तरले, तोडगा निघेल ना निघेला पण आम्ही ताकदीने लढणार आहोत. आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. ते प्रतिसाद देतील अगर ना देतील पण आम्ही सज्ज आहोतच, असे ते म्हणाले.
समितीसोबत नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला असता, तेव्हा मागणीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. त्यानंतर सरकार मागणीबाबत सकारात्मक आहेत का? असा प्रश्न केला असता, त्यावर ते म्हणाले की, मरेपर्यंत इथून उठणार नाही. पुढच्या शनिवारी आणि रविवारी संपूर्ण महाराष्ट्र झाडून पुसून मुंबईत येणार, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
सरकारने म्हणावी अशी सोय केलेली नाही, खरं तर त्यांनी सोय करणे गरजेचं आहे. आमचे लोक मुंबईत फिरतात कोणालाही त्रास देत नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की, आपल्याला खोट्या बातम्या महाराष्ट्राला द्यायच्या आहेत. मग पोलीस मराठ्यांच्या गाड्या अडवायचं काम करतात. मराठ्यांच्या पोरांनी विचारलं का अडवता? तर त्यावर पोलीस काहीच बोलत नाहीत. मग गाड्या तशाच राहतात आणि आठ ते दहा तास वेळ तसाच जातो. त्यानंतर आमच्या खोट्या बातम्या पसरवतात की, मराठ्यांनी गाड्या लावल्या.
हे ही वाचा : Maratha Reservation: मनोज जरांगेंशी चर्चा करायला शिंदे समिती आझाद मैदानावर आली, पण...
फडणवीसांनी दोन खून केलेत
त्यानंतर 'मुंबई तक'शी बोलताना सांगितलं की, सरकारने तुमची सर्वच सोय बंद केली. जसे की खाऊ गल्ली असेल, त्यानंतर शौचालयाला कुलूप लावले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी दोन खून केलेत. एकानं आत्महत्या केली आणि एकाला हृदयविकाराचा झटका आला, पण तो व्यक्ती आंदोलनासाठीच येत होता. आता मृत्यू झालेल्या मुलाच्या आईच्या जीवाला असंच वाटत असेल की, माझा मुलगा देवेंद्र फडणवीसांमुळेच गेला. जर आरक्षण दिलं असतं, तर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
