Thane : प्राचार्याकडूनच कॉलेजमधील महिला शिक्षकांचा लैंगिक शोषण, मनसेनं चोप दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल

माध्यमांशी बोलताना महिला शिक्षिकांनी त्या मुख्याध्यापकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे नेते मोरे यांनी आरोप केला की, प्राचार्य दोन महाविद्यालयांशी संबंधित आहेत, जे मुळात बेकायदेशीर आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Jan 2025 (अपडेटेड: 26 Jan 2025, 09:55 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील महाविद्यालयात प्राचार्यावर गंभीर आरोप

point

मनसे कार्यकर्त्यांनी दिला होता चोप

point

महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतरगुन्हा दाखल

Thane Crime News : ठाणे शहरातील एका महाविद्यालयातील प्राचार्य आणि तीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर महिला शिक्षिकांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर पोलिसांच्या माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील एका महाविद्यालयातील चार महिला शिक्षिकांनी प्राचार्य, अध्यक्ष आणि इतर दोन व्यवस्थापन अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत लैंगिक छळ, अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप 

हे ही वाचा >> Palghar : घुसखोरी करून भारतात, रेल्वेनं थेट महाराष्ट्रात आले... पालघऱमधून 9 बांगलादेशी नागरिकांना अटक

या घटनेपूर्वी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते मुख्याध्यापकांना मारहाण करताना दिसत होते. मुख्याध्यापकांनी असभ्य वर्तन केल्याची तक्रार शिक्षकांनी मनसेकडे केली होती. मनसे ठाणे शहर प्रमुख रवींद्र मोरे म्हणाले, महिला शिक्षकांच्या तक्रारीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्याला चोप दिला.

तक्रारीत काय म्हटले होतं?

हे ही वाचा >> Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. विलास डांगरेंसह 'या' दिग्गजांना मिळाला पद्मश्री पुरस्कार

तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्र कपाटात बंद केली आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना महिला शिक्षिकांनी त्या मुख्याध्यापकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे नेते मोरे यांनी आरोप केला की, प्राचार्य दोन महाविद्यालयांशी संबंधित आहेत, जे मुळात बेकायदेशीर आहे. त्यांनी असंही सांगितलं की महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. पोलिसांनी सांगितलं की, सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

    follow whatsapp