गाडीवर भारत सरकारचा बोर्ड, IAS असल्याचं ओळखपत्र दाखवून सगळ्यांना गंडवलं, पोलिसांनी कसं पकडलं?

शनिवारी मलाडमधील एका हॉटेलबाहेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ड्रायव्हरसह कारमधून फिरताना पकडलं. सिंहने पोलिसांना बनावट ओळखपत्र दाखवलं आणि सुरुवातीला स्वत:ला IAS अधिकारी असल्याचा दावा केला.

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:26 AM • 01 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाहतूक पोलिसांनी पकडल्या IAS सांगून निसटला

point

कस्टमच्या सगळ्या सुविधांचा IAS म्हणून लाभ घेतला

point

पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला तोतया अधिकारी?

मुंबई : मुंबई पोलिसांनी 32 वर्षीय चंद्रमोहन सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली. या व्यक्तिने केलेला बनाव हा एखाद्या सिनेमाच्या कहाणीसरखा आहे. बनावट  IAS अधिकारी असल्याचा दावा करत, कस्टम गेस्ट हाउसमध्ये ही व्यक्ती राहत होती. या फसव्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sangli: आधी मित्राला हळदीला नेलं, येताना केली 'ती' घाणेरडी मागणी, मित्राने नकार देताच...

बिहारचा रहिवासी असलेला हा आरोपी 'भारत सरकार' नावाची प्लेट असलेल्या कारमधून प्रवास करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह हा गृह मंत्रालयाचा कर्मचारी असल्याचा दावा करत कस्टमच्या सुविधांचा लाभ घेत होता. यापूर्वी दादरमध्ये एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं. मात्र, त्यावेळी त्याने स्वत:ला IAS अधिकारी असल्याचं सांगून तिथून पळ काढला. 

कारवर 'भारत सरकार'चा बोर्ड

शनिवारी मलाडमधील एका हॉटेलबाहेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ड्रायव्हरसह कारमधून फिरताना पकडलं. सिंहने पोलिसांना बनावट ओळखपत्र दाखवलं आणि सुरुवातीला स्वत:ला IAS अधिकारी असल्याचा दावा केला. मात्र, पोलीस तपासात त्याचे दस्तऐवज बनावट असल्याचं आढळलं तेव्हा त्याने कबुली दिली. संरक्षण मंत्रालयात काम करत असल्याचा दावा करणारा आणखी एक बनावट दस्तऐवजही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. 

हे ही वाचा >>आई-वडील गेले, भावानेही स्वत:ला संपवलं म्हणून मानसिक धक्का, अनूपने 3 वर्ष स्वत:ला एकाच फ्लॅटमध्ये...

पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहच्या या फसवणुकीमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलीस त्याच्या मागील कारवायांचा आणि या कृत्यामागील उद्देशाचा तपास करत आहेत.


 

    follow whatsapp