आज दिवसभरात महाराष्ट्रात 7 हजार 568 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 51 हजार 956 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.76 टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 505 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. आज राज्यात 4 हजार 505 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात दिवसभरात 68 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.1 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 97 लाख 25 हजार 694 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 53 हजार 833 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 21 हजार 683 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2 हजार 895 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत.
राज्यात आज घडीला 68 हजार 375 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 505 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 57 हजार 833 इतकी झाली आहे.
मुंबईत 208 पॉझिटिव्ह रूग्ण
मुंबईत 208 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. 372 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 15 हजार 389 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. डबलिंग रेट 1680 इतका झाला आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रूग्ण
नाशिकमध्ये डेल्टाचे रूग्ण आढळले असल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता ठाण्यात डेल्टा प्लसचे चार रूग्ण आढळले आहेत. नाशिकनंतर ठाण्यात डेल्टा प्लस व्हायरसचे रूग्ण वाढल्याने चिंताही वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात ठाणे महापालिकेला यश आलं. त्यात आता चार रूग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आल्याने चिंता वाटू लागली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तीन तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एक रूग्ण आढळून आला आहे.
ADVERTISEMENT
