मुंबईकरांच्या एसी लोकलच्या तिकिट दरांचे दर ५० टक्क्यांनी कमी कऱण्यात येणार आहेत. या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
मुंबईत एसी लोकलचे दर कमी करण्याची लोकांची मागणी होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. आम्ही मुंबईकरांना दिलासा देत आहोत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा हीच आमची अपेक्षा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. त्याच प्रमाणे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो.
मुंबईकरांनी एसी ट्रेनचे दर कमी करण्याची मागणी केली होती. आज त्याचे दर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घोषित झाला आहे. हळूहळू किफायतशीर दरांमध्ये लोकल ट्रेन्सचा प्रवास कमी दरांमध्ये करायला मिळेल याचा मला विश्वास वाटतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईत एसी लोकल सुरू झाल्या खऱ्या मात्र त्यांच्या फेऱ्या मर्यादित आणि भाडं भरमसाठ होतं. त्यामुळे या दरांमध्ये कपात करण्याची मागणी मुंबईकरांनी केली होती. आहेत त्या दरांमध्ये २० ते ३० टक्के कपात केली जाईल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात एसी लोकलच्या दरांमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दर कमी करण्याविषयीचा एक प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला आहोत.
तिकिटांचे दर कमी करण्यात आल्यानंतर आता लोक एसी लोकलला चांगला प्रतिसाद देतील असा विश्वासही रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने एसी लोकल चालवण्यात येतात. मात्र खिशाला परवडणारे तिकीट दर नसल्याने या लोकलला म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. आता प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी तिकिट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
