आठवडाभरापूर्वी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची चिन्हं दिसत आहे. मुंबईत मागील २४ तासांत ६,०३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर याच कालावधीत १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
जानेवारीच्या सुरूवातीलाच मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. गेल्या आठवड्यात मुंबईत दररोज २० हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्ही रेटही वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचं दिसत आहे.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, Corona Pandemic ची परिस्थिती नियंत्रणात – महापालिकेची हायकोर्टात माहिती
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत १८,२४१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका असून, सक्रिय रुग्णसंख्या ३१ हजार ८५६ इतकी आहे. सध्या मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा कालवाधी ६६ दिवस इतका आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.०३ टक्के आहे.
मागील काही दिवसांत मुंबईत आढळून आलेले रुग्ण
११ जानेवारी – ११,६४७
१२ जानेवारी – १६,४२०
१३ जानेवारी – १३,७०२
१४ जानेवारी – ११,३१७
१५ जानेवारी – १०,६६१
१६ जानेवारी – ७,८९५
१७ जानेवारी – ५,९५६
१८ जानेवारी – ६,१४९
१९ जानेवारी – ६०३२
Covid Update : कोरोनाचं संकट निवळलंय का?; ‘कोरोना पीक’बद्दल तज्ज्ञाचं भाष्य
पुन्हा चाचण्यांवर भर
मुंबईतील कोरोना पीक संपल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना चाचण्यांमध्ये झालेली घट हाही चर्चेचा मुद्दा ठरत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं. मात्र, दुसरीकडे कोरोना चाचण्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. १७ आणि १८ जानेवारीला मुंबईत ४७ हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात आल्या. तर गेल्या २४ तासांत चाचण्यांची संख्या वाढली असून, ६० हजरा २९१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
