मुंबईतल्या राम मंदिराच्या शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबईतल्या गोरेगावमध्ये राम मंदिराच्या शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह पूर्णपणे कुजला आहे. ही महिला कोण होती याची ओळख मृतदेह कुजल्याने पटू शकलेली नाही. पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हेदेखील आत्ताच सांगणं कठीण आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण आठ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:33 AM • 09 Feb 2022

follow google news

मुंबईतल्या गोरेगावमध्ये राम मंदिराच्या शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह पूर्णपणे कुजला आहे. ही महिला कोण होती याची ओळख मृतदेह कुजल्याने पटू शकलेली नाही. पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हेदेखील आत्ताच सांगणं कठीण आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण आठ दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असावा.

हे वाचलं का?

Crime: विहिरीत ढकलून जावयाने केली सासूची हत्या

या महिलेच्या शरीरावर जखमेच्या कुठल्या खुणा नाहीत. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने या महिलेची ओळख पटवणं कठीण झालं आहे. बुधवारी सकाळी ही कार पोलिसांना आढळली आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मुंबईत दुहेरी हत्याकांड, 89 वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या

मुंबईतल्या अंधेरी भागात कालच एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं होतं. एका वृद्ध माणसाने त्याच्या बायकोला आणि मुलीला गळा चिरून संपवलं. यानंतर आपल्या दुसऱ्या मुलीला फोन करून ही घटना सांगितली. बायको आजारी आणि मुलगी गतिमंद असल्याने त्याने हे पाऊल उचललं. अंधेरीतल्या शेर-ए-पंजाब कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

ही घटना ताजी असतानाच आता गोरेगाव येथील राम मंदिर भागात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांचं पुढचं आव्हान आहे.

    follow whatsapp