शौचालयाच्या छतावर आढळला तरुणाचा विवस्त्र मृतदेह, हातात कंडोमचे पाकीट अन्.., धक्कादायक प्रकरण

Crime News : शौचालयाच्या छतावर एका 25 वर्षीय तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत्यूचे गूढ वाढवणारी बाब म्हणजे मृत तरुणाच्या हातात कंडोमचे पाकीट सापडले आहे. यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:45 PM • 19 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शौचालयाच्या छतावर आढळला तरुणाचा विवस्त्र मृतदेह

point

हातात कंडोमचे पाकीट अन्..

point

धक्कादायक प्रकरण

Crime News : शौचालयाच्या छतावर एका 25 वर्षीय तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत्यूचे गूढ वाढवणारी बाब म्हणजे मृत तरुणाच्या हातात कंडोमचे पाकीट सापडले आहे. यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर परिसरात गुरुवारी (19 मार्च) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

असा उघड झाला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर-वाराणसी महामार्गापासून अवघ्या वीस मीटर अंतरावर राजेंद्र यादव यांची पिठाची गिरणी आहे. गुरुवारी सकाळी गिरणी मालकाचा मुलगा नेहमीप्रमाणे शौचालयाकडे जात असताना, त्याला शौचालयाच्या शेडवर एक व्यक्ती पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर तो विवस्त्र अवस्थेतील मृतदेह असल्याचे समजताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने आरडाओरडा करून गावकऱ्यांना जमा केले आणि 112 वर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

तपासात धक्कादायक धागेदोरे

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतदेहापासून साधारण 25 मीटर अंतरावर असलेल्या एका गुलरच्या झाडावर मृत तरुणाची पँट आणि टी-शर्ट लटकलेल्या अवस्थेत सापडले. हे कपडे त्याच तरुणाचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.

हे ही वाचा : 9 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तरुण करायचा टॉर्चर, पीडितेनं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन

गूढ वाढले, तपास सुरू

भरवस्तीत आणि हायवेच्या इतक्या जवळ अशा अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला आणि तो विवस्त्र अवस्थेत शेडवर कसा पोहोचला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. 'सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा केला जाईल,' असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
 

    follow whatsapp