ग्रामीण पुण्यात बेपत्ता तरुणाची निर्घृणपणे हत्या, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ

मुंबई तक

• 03:51 PM • 19 Mar 2026

Pune crime : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जैदवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. गेल्या तीन दिवसांपासून तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृत तरुणाचे नाव धनंजय मारुती घेवडे (वय 33) असे आहे. तरुणाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Pune crime

Pune crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात तरुणाची हत्या

point

हल्ल्याची क्रूरता लक्षात घेता नियोजनपूर्व हत्येचा कट

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जैदवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. गेल्या तीन दिवसांपासून तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृत तरुणाचे नाव धनंजय मारुती घेवडे (वय 33) असे आहे. तरुणाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तरुण हा मूळ आंबेगाव तालुक्यातील करेगावचा रहिवासी होता, सध्या तो राक्षेवाडी येथे वास्तव्यास होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, 16 मार्च रोजी रात्री 9 वाजल्यापासून धनंजय घेवडे बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेणं सुरु आहे. सकाळी 11 वाजताना जैदवाडी परिसरात निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तसेच धारदार शस्त्राने तोंडावर सपासप वार करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. 

हे ही वाचा :  9 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तरुण करायचा टॉर्चर, पीडितेनं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन

हल्ल्याची क्रूरता लक्षात घेता नियोजनपूर्व हत्येचा कट

घटनास्थळी मृतकाची दुचाकी आढळून आली. हल्ल्याची क्रूरता लक्षात घेता नियोजनपूर्व हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेनं जैदवाडी आणि इतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. आरोपींनी लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.