मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट -12 ने एकास अटक केली आहे. प्रदीप भालेकर असं अटक झालेल्या व्यक्तीच नाव आहे. न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, पोलिसांनी प्रदीप भालेकर याचा मोबाईलही जप्त केला आहे. त्याने ट्विटर हॅन्डेलवरुन वेगवेगळ्या राजकारण्यांना अपशब्द वापरल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी त्याच्यावर मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात अक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणीही भालेकरला अटक करण्यात आली होती.
ऑगस्टमध्ये काय घडलं होतं?
मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी टीकेचे धनी झाले होते. गुजराती, राजस्थानी लोकांना मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं.
या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी राज्यपाांना निशाणा बनवलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, यात प्रदीप भालेकरने ट्विट करुन राज्यपालांना खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर प्रदीप भालेकरला अटक केली होती.
ADVERTISEMENT
