मुंबईत पोलिस, पालिका-सफाई कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात

मुंबई तक

• 10:27 AM • 04 Feb 2021

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पोलिस, महापालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईत सध्या तरी 8 हजार जणांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्याचं महापालिकेचं लक्ष्य आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी इंडिया टूडेला ही माहिती दिली आहे. मुंबईत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुंबई […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुंबई पोलिस, महापालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईत सध्या तरी 8 हजार जणांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्याचं महापालिकेचं लक्ष्य आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी इंडिया टूडेला ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जशी वॉल्क इन सेवा, म्हणजेच नोंदणी असलेल्या आरोग्य सेवकांना ते येतील तेव्हा लस दिली जातेय, तशी सुविधा सध्या तरी दुसऱ्या टप्प्यातील कोविड योद्ध्यांना नाहीये.

मुंबईतल्या अनेक खाजगी हॉस्पिटल्सनेही त्यांच्याकडे लसीकरणाचे केंद्र उभारण्याची परवानगी मागितली आहे. मात्र तिथे सर्व सुविधा कशाप्रकारे उपलब्ध होतील, याची चाचपणी मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. दरम्यान एकीकडे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचाही श्रीगणेशा होत असला, तरी कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी दूर झालेल्या नाहीत.

    follow whatsapp