साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

• 01:31 PM • 22 Jan 2022

सातारा: सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथे एका 24 वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळीनी केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणी सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा सिव्हील व पोलीस सहकार्य करत नसल्याने […]

Mumbaitak
follow google news

सातारा: सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथे एका 24 वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 24 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळीनी केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणी सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

याप्रकरणी सातारा सिव्हील व पोलीस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, विवाहितेचा पती शंकर काळूराम भोळे, सासू लिलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाऊ स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. संगमनगर, सातारा) या संशयित आरोपींवर खुनासह विविध कमलान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

माहेरी गेलेल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

यामध्ये सुजाता शंकर भोळे (वय 24, रा. संगमनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पुण्यात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सुजाताच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.

मात्र, आपल्या सुजाताची हत्या तिच्या सासरकडच्या मंडळींनीच केली असल्याची तक्रार तिचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ (वय 48, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. सुजाताला आई व वडील नव्हते त्यामुळे तिचा लहानपणापासून चुलत्यांनीच तिचा सांभाळ केलेला होता.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील 14 नंबर जवळील शिंदे मळ्यात रात्री एका 59 वर्षीय पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 51 वर्षीय पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली होती.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संध्या सुरेश शिंदे (वय 51 वर्ष) या महिलेची त्यांचे पती सुरेश दगडू शिंदे (वय 59 वर्ष) याने गळा आवळून हत्या केली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी महिलेचा पती आरोपी सुरेश शिंदे याची सुरुवातीला चौकशी केली. त्यानंतर चौकशीत सुरेश शिंदे सहाय्य करत नसल्याने नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी सुरेश शिंदेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपणच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली होती.

    follow whatsapp