नारायण राणे डरपोक, घाबरून भाजपमध्ये गेले नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर

मुंबई तक

• 09:25 AM • 05 Nov 2021

नारायण राणे म्हणजे डरपोक माणूस आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपला शत्रू समजत होते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर आणि आता मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शत्रू वाटतो आहोत. ते घाबरून भाजपमध्ये गेले आहेत असं म्हणत आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात […]

Mumbaitak
follow google news

नारायण राणे म्हणजे डरपोक माणूस आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपला शत्रू समजत होते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर आणि आता मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शत्रू वाटतो आहोत. ते घाबरून भाजपमध्ये गेले आहेत असं म्हणत आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात कुणीही कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात हे नारायण राणे विसरले आहेत असंही मलिक म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीही केला नाही. आज नारायण राणे सांगत आहेत की की अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, आमचं पूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात जायला तयार आहे. मात्र आम्ही कधीही भिऊन पक्ष सोडणार नाही असंही मलिक यांनी म्हटलं आहे. माझ्या आयुष्याबाबत काहीही गोष्टी समोर येणार असतील तरीही त्या येऊ दे. मी कोणाच्याही कुटुंबीयांना टार्गेट केलं नाही. ड्रग्जच्या पैशातून अल्बम तयार केले गेले आहेत हे मी लोकांसमोर आणलं आहे. काय समोर आणायचं ते समोर आणा आम्ही डरत नाही असंही मलिक म्हणाले आहेत.

राणेंनी काय म्हटलं होतं?

लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला लगावताना कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला. मलिक काहीही बोलतात. रोज उठसूठ आरोप करत आहेत. वानखेंडेवर त्यांनी आरोप केले आहेत. मला म्हणायचंय, दुसऱ्यांचे पँट शर्ट पाहण्यासाठी ते लोकांच्या बेडरुममध्ये जाताच कशाला, मला त्यांना सांगायचंय की दरा जपून राहा. तुमचं काढलं तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी राणेंनी मलिकांनी दिला. त्यावर आता नवाब मलिकांनी राणेंना डरपोक म्हटलं आहे.

नकली देवेंद्र ते 15 कोटींची पार्टी; नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

नवाब मलिक यांनी काय आरोप केले होते?

‘ज्ञानेश्वर सिंग आणि इतर अधिकारी हे टीव्हीवर येतात. पण कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हा 1000-500 रुपयांपेक्षा महाग नाही. पण समीर वानखेडेंचा शर्ट हा 70 हजार रुपये किंमतीचा का असतो? दररोज नवे कपडे परिधान करुन येतात हे तर मोदी साहेबांच्या देखील पुढे निघून गेले आहेत.’ ‘त्यांची पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाख रुपयांचा, शूज अडीच लाख रुपयांचे. घड्याळ 50-25 लाखांचे… या सगळ्या दिवसात त्यांनी जे कपडे परिधान केलेले आहेत त्याची एकूण किंमतच 5-10 कोटींची आहे.’ असा दावा मलिकांनी केला आहे.

‘इमानदार अधिकारी 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो?’

‘इमानदार अधिकारी काय 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो? कोणताही शर्ट त्यांनी पुन्हा परिधान केला आहे हे आम्हाला पाहायला मिळालं नाही. यापेक्षा इमानदार कोणीही असू शकत नाही जो दोन लाख रुपये किंमतीचे शूज दररोज परिधान करेल.’

नवाब मलिक यांच्यावरही नारायण राणेंनी केली. तुम्ही इतरांबद्दल कशाला बोलता? तुमचं तर आता काय काय निघणार आहे ते बघा. उंबरठ्यावर आहे सगळं.. लवकरच स्फोट होणार आहे असा सूचक इशाराही नारायण राणेंनी दिला आहे. नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसने सोडून दिलं आहे. ते आत्ता बोलत आहेत पण त्यांनीही त्यांच्या काय काय गोष्टी बाहेर निघणार ते बघा.

    follow whatsapp