नाशिकमध्ये ‘मविआ’चा प्लॅन ठरला! काँग्रेसच्या नामुष्कीनंतर ठाकरे गट मैदानात

ऋत्विक भालेकर

14 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:16 AM)

Shiv sena (UBT) support to subhangi Patil : नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्या अर्ज न भरण्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यानंतर आता इथून ठाकरे गट मैदानात उतरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडला आहे. तसंच या […]

Mumbaitak
follow google news

Shiv sena (UBT) support to subhangi Patil :

हे वाचलं का?

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्या अर्ज न भरण्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यानंतर आता इथून ठाकरे गट मैदानात उतरला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडला आहे. तसंच या निर्णयानंतर ठाकरे गटाने इथून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबाही जाहीर केला आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी (१५ डिसेंबर) होणार आहे.

काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी आणि एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अर्ज न भरला नाही. त्याऐवजी त्यांचेच पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या सगळ्या प्रकरामुळे काँग्रेसवर नामुष्की ओढावली होती. यानंतर काँग्रेसने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर वेगाने सूत्र फिरली आणि शुभांगी पाटील मातोश्रीवर दाखल झाल्या.

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुभाष देसाई, संजय राऊत, उमेदवार शुभांगी पाटील आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसह एक बैठक पार पडली. याच बैठकीत शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब झाला. तसंच नागपूरची शिवसेना (UBT) गटाला मिळालेली जागा काँग्रेसला सोडण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती आहे. या दोन्ही गटांनी जागांची अदलाबदल केल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे.

सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?

दुसऱ्या बाजूला भाजपनेही नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते पण भाजपने कोणालाही एबी फॉर्मच दिला नाही. त्यामुळे आता भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर करणार आहे का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठिंबा मागितला तर नक्की विचार करु, अशी प्रतिक्रिया देऊन सस्पेन्स कायम ठेवला आहे.

    follow whatsapp