आधी Registration मगच मिळणार लस, मुंबई महापालिकेचे आदेश

कोविन अॅपवर नोंदणी (registration ) केली नसेल तर लस मिळणार नाही असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने तसा आदेशच काढला आहे. ज्या कुणालाही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठीची लस घ्यायची आहे त्या सगळ्यांनी आधी Cowin या पोर्टलवर आधी रजिस्ट्रेशन करावं. तसंच रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस घेण्यासाठीचा Slot ही चेक करावा असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. महाराष्ट्रात […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:14 PM • 06 May 2021

follow google news

कोविन अॅपवर नोंदणी (registration ) केली नसेल तर लस मिळणार नाही असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने तसा आदेशच काढला आहे. ज्या कुणालाही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठीची लस घ्यायची आहे त्या सगळ्यांनी आधी Cowin या पोर्टलवर आधी रजिस्ट्रेशन करावं. तसंच रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस घेण्यासाठीचा Slot ही चेक करावा असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात दोन दिवसात घटलं लसीकरणाचं प्रमाण, अवघ्या 1 लाख 27 हजार जणांचं लसीकरण

अपवादात्मक परिस्थितीत कुणाला सूट देण्यात येईल?

45 वर्षे आणि त्यावरील वयाचे नागरिक ज्यांचा Covaxin या लसीचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांनी लस घ्यायला येताना पहिला डोस मिळाल्याचं प्रमाणपत्र आणणं आवश्यक आहे. सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी सोबत असणं आवश्यक आहे.

आरोग्य सेवांसाठी काम करणारे कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांच्या दुसऱ्या डोससाठी. मग तो कोव्हिशिल्डचा असो किंवा कोव्हॅक्सिनचा.

हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा जर पहिला डोस राहिला असेल तर त्यांच्यासाठी.

हे तीन निकष सोडून इतर सगळ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करावीच लागणार आहे.

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण ही घोषणा मोदी सरकारने तयारीशिवायच केली?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासतो आहे. लसींची मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्युट यांनाही ऑर्डर केली आहे. आज घडीला लसीकरणाची गती मंदावली आहे कारण म्हणाव्या त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. दिवसाला पाच लाख लसीकरण करण्याचं महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे. हे प्रमाण 8 लाखांपर्यंतही वाढवण्याची आपली क्षमता आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ मेच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं. अशात आता लसीकरण करायचं असेल तर आधी रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू झालं आहे. या लसीकरणासाठी कोविन या अॅपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतरच लस मिळू शकणार आहे.

    follow whatsapp