पुणे : मराठे ज्वेलर्सचे मंजिरी आणि कौस्तुभ मराठे यांना अटक

मुंबई तक

• 06:45 AM • 15 Sep 2021

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सकडून विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या अनेक ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वलर्सचे कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी विष्णू कुटे (वय 59, रा. कोथरूड ) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभांगी कुटे […]

Mumbaitak
follow google news

पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सकडून विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक केलेल्या अनेक ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वलर्सचे कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

शुभांगी विष्णू कुटे (वय 59, रा. कोथरूड ) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभांगी कुटे यांनी पुणे शहरातील मराठे ज्वेलर्समध्ये विविध सोने-चांदीच्या योजनेत पैसे गुंतवले होते. मात्र आपण गुंतवलेल्या पैशावर कोणत्याही प्रकाराचा परतावा मिळत नसल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर शुभांगी विष्णू कुटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर पोलिसानी या प्रकरणाचा तपास केला. तपासात 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं. त्यानंतर कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे या दोघांना अटक करण्यात आली.

या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp