Oxygen Politics : देवेंद्र फडणवीस विरूद्ध महाविकास आघाडी

मुंबई तक

• 12:29 PM • 26 Apr 2021

Oxygen वरून राज्यात राजकारण रंगताना दिसतं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटला आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी ट्विट केली आहे आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत त्याला उत्तर देत आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. कोरोना लस, Oxygen उपकरणांवरील Custom Duty तीन महिन्यांसाठी […]

Mumbaitak
follow google news

Oxygen वरून राज्यात राजकारण रंगताना दिसतं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटला आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी ट्विट केली आहे आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत त्याला उत्तर देत आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

कोरोना लस, Oxygen उपकरणांवरील Custom Duty तीन महिन्यांसाठी माफ

काय म्हणाले आहेत सचिन सावंत?

प्रिय फडणवीसजी आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. 1250 मेट्रिक टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदी सरकारच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. मोदी सरकारचा हा धूर्तपणा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं होतं ट्विट?

महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार.

महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक यादीही जाहीर केली आहे. नेमक्या याच ट्विटला आता काँग्रेसने उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने 15 ते 30 एप्रिल या 15 दिवसांत 25000 मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे असं सांगितलं होतं. 17500 मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला 7500 मे.टन म्हणजे 500 मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु 345 मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी logistics अडचणी येत आहेत. असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp