Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या जवळपास, प्रचंड महागाईने मुंबईकर हैराण

मुंबई तक

• 03:44 AM • 27 May 2021

मुंबई: Petrol and Diesel Price Today 27 May 2021: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (27 May 2021) जाहीर केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील पेट्रोल जवळजवळ शंभर रुपये झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर हे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: Petrol and Diesel Price Today 27 May 2021: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (27 May 2021) जाहीर केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील पेट्रोल जवळजवळ शंभर रुपये झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर हे 99.94 रुपये एवढे आहे. याचाच अर्थ मुंबईत पेट्रोल हे आता शंभर रुपयांपासून फक्त 6 पैसेच दूर आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी स्थानिक करांचा विचार केल्यास पेट्रोल आजच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

तर मुंबईत डिझेल (diesel) देखील प्रचंड महाग झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईत डिझेलचे दर 91.87 रुपये प्रति लीटर एवढं झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य मुंबईकर मात्र फारच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रमाणेच देशातील इतर शहरांमध्ये देखील इंधनाचे दर (Fuel Price) प्रचंड वाढले आहेत.

‘चार राज्यांचे निवडणूक निकाल लागले, आता पेट्रोल डिझेलचे दर वाढणार की काय?’

जाणून घ्या मोठ्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर:

दिल्लीत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 93.68 रुपये आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रतिलिटर 84.61 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 93.72 रुपये आणि डिझेल 87.66 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 95.28 रुपये तर डिझेलची किंमत 89.39 रुपये आहे. यापूर्वी बुधवारी (26 मे) पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. इथे पेट्रोल 101.77 आणि डिझेल 95.28 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

Petrol-Diesel ची दरवाढ सुरूच, तुमच्या शहरात पेट्रोल 100 रूपये लिटर झालंय का?

बुधवारी तेलाचे दर काय होते?

बुधवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. म्हणजेच 26 मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी (OMC) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्या नव्हत्या. त्यानंतर मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 99.71 रुपये तर डिझेलची किंमत 91.57 रुपये प्रतिलिटर एवढी होती. एक दिवस अगोदर 20 ते 27 पैसे प्रतिलिटर वाढीसह देशभरातील इंधनाचे दरही बुधवारी स्थिर राहिले. परंतु राज्यांच्या स्थानिक करांच्या पातळीनुसार त्यांच्यात किरकोळ किंमतींमध्ये बदल पाहायला मिळाला होता.

    follow whatsapp