Phaltan : दोन गटात तुंबळ हाणामारी; रागात घर, गाड्या, जनावरांचा गोठा दिला पेटवून

मुंबई तक

06 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

Satara | Phaltan Crime : सातारा : फलटण (Phaltan) तालुक्यातील मिरेवाडी येथे रस्ता आणि घराच्या बांधकामाच्या कारणावरून मिरेवाडीत २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यातूनच घर, गाड्या, जनावरांचा गोठा पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारींवरुन ४२ जणांवर लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (clash […]

Mumbaitak
follow google news

Satara | Phaltan Crime :

हे वाचलं का?

सातारा : फलटण (Phaltan) तालुक्यातील मिरेवाडी येथे रस्ता आणि घराच्या बांधकामाच्या कारणावरून मिरेवाडीत २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यातूनच घर, गाड्या, जनावरांचा गोठा पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारींवरुन ४२ जणांवर लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (clash between two groups; In anger, houses, cars, cattle sheds were set on fire)

Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत

याबाबत सुनिल धायगुडेंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिरेवाडी गावच्या हद्दीत थोरात रस्त्यासाठी असलेल्या जागेवरून नामदेव धुमाळ आणि विनोद रुपनवर यांच्यात वाद सुरू आहे. यादरम्यान, संतोष शेळके, निलेश शेळके, अक्षय रुपनवर यांच्यासह २२ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला.

शेजारी राहणाऱ्या नामदेव धुमाळ, सौ. आशा धुमाळ, सायली धुमाळ, विराज धुमाळ, तुषार धुमळ, चालक जय बहादूर बीष्ट यांना हाताने लथाबुक्यांनी तसेच काठीने आणि रॉडने मारहाण केली. तसंच त्यांचे राहते घर, पिकअप, स्कुटी, दोन ट्रॅक्टर, धान्य आणि जनावरांचा गोठा नष्ट करण्याचे उद्देशाने पेटवून दिला. यावरुन २२ जणांच्या विरोधात लोणंद पोलिसात फिर्याद दिली आहे. (clash between two groups; In anger, houses, cars, cattle sheds were set on fire)

Crime: मीरा रोड परिसर हादरला! चप्पलेवरून भांडण… शेजाऱ्याने जीवच घेतला

तर विनोद रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं १० मध्ये स्वतःच्या घराचे बांधकाम चालू असताना त्याच गावातील २० जणांनी बेकायदा जमाव जमवून हातात काठ्या घेऊन “तुम्ही येथे घराचे बांधकाम करायचे नाही” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. तसंच घराचे नवीन बांधकाम हाताने पाडून नुकसान केले. बांधकाम बंद पाडल्याचा जाब विचारला असता त्यांनी विनोद रुपनवर, त्यांची पत्नी शीतल, भावजय रुपाली, आई बायडाबाई या चार जणांना हाताने आणि लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. यावरुन २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

    follow whatsapp