विधानसभेचा बदला घेतला! 4 महिन्यांच्या बाळ सोबत घेऊन लढल्या, राम सातपुतेंच्या पत्नीनं जानकरांच्या मुलाला हरवलं

Solapur ZP Election Result 2026 : निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच संस्कृती सातपुते या वेगळ्या कारणामुळे चर्चेत होत्या. चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी गावोगावी प्रचार केला. या दृश्यामुळे महिला मतदारांमध्ये मोठी सहानुभूती निर्माण झाली आणि प्रचाराला वेगळीच भावनिक धार मिळाली. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विरोधकांकडून या मायलेकीवर सोशल मीडियातून टीका करण्यात आली होती.

Solapur ZP Election Result 2026

Solapur ZP Election Result 2026

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 12:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आमदार उत्तम जानकरांना तगडा झटका

point

ZP निवडणुकीत मुलाचा पराभव, राम सातपुतेंच्या पत्नीने मारली बाजी

Solapur ZP Election Result 2026, सोलापूर : माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात रंगलेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवत बाजी मारली आहे. या निकालामुळे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव झाला आहे. तालुक्यात ‘बिग फाईट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा, काही राशीतील लोकांच्या नोकरीत होणार बढती

निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच संस्कृती सातपुते या वेगळ्या कारणामुळे चर्चेत होत्या. चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी गावोगावी प्रचार केला. या दृश्यामुळे महिला मतदारांमध्ये मोठी सहानुभूती निर्माण झाली आणि प्रचाराला वेगळीच भावनिक धार मिळाली. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विरोधकांकडून या मायलेकीवर सोशल मीडियातून टीका करण्यात आली होती. या टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेत राम सातपुते यांनी प्रचारसभेत संताप व्यक्त केला होता. राजकीय लढत माझ्याशी आहे, मग लहान बाळाला लक्ष्य करण्याचे कारण काय, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

"माळशिरस तालुक्यातील भाजपच्या विजयी सलामीने लोकसभा आणि विधानसभेचा बदला घेतलेला आहे. भाजपचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला यायचा आहे", अशी प्रतिक्रिया माजी आमदार राम सातपुते यांनी दिली होती. 

अखेर निकालाच्या दिवशी दहिगाव गटात संस्कृती सातपुते यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. या निकालामुळे माळशिरस तालुक्यातील आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची लढत सातपुते कुटुंबाच्या बाजूने झुकली आहे. तर दुसरीकडे, आमदार उत्तम जानकरांसाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात असून, जिल्हा परिषद निवडणुकीत हा निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरत आहे.ट

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

    follow whatsapp