Pune ZP Election Result : पती ZP च्या गटातून विजयी, तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 04:39 PM)

Pune ZP Election Result 2026: भोरमधील भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम खुटवड यांनी विजय मिळवला आहे. तर भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड या विजयी झाल्या आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने दोन वेगवेगळ्या पदांवर यश मिळवल्याने भोरच्या राजकारणात या निकालाची विशेष चर्चा होत आहे. या विजयामुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Pune ZP Election Result

Pune ZP Election Result

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Pune ZP Election Result : पती ZP च्या गटातून विजयी,

point

तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी

Pune ZP Election Results 2026 पुणे : भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले असून पती-पत्नीने निवडणुकीत बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

हे वाचलं का?

भोरमधील भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम खुटवड यांनी विजय मिळवला आहे. तर भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड या विजयी झाल्या आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने दोन वेगवेगळ्या पदांवर यश मिळवल्याने भोरच्या राजकारणात या निकालाची विशेष चर्चा होत आहे. या विजयामुळे भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा : बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय

पुणे जिल्हा परिषद निकालांचा आढावा

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 73 जागांपैकी 56 जागांचे निकाल किंवा आघाडीची स्थिती स्पष्ट झाली आहे. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार विविध पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 28 जागांवर आघाडी घेतली. त्यापाठोपाठ दुसऱ्या भारतीय जनता पक्षाने 20 जागांवर आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. सेनेने 7 जागांवर आघाडी मिळवली आहे. इतर पक्षांमध्ये एका पक्षाने 3 जागांवर, तर ठाकरे गटाने 1 जागेवर आघाडीघेतली आहे. उर्वरित जागांचे निकाल हाती येणे बाकी असून, अंतिम निकालानंतर पुणे जिल्ह्यातील सत्तासमीकरण नेमके कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विधानसभेचा बदला घेतला! 4 महिन्यांच्या बाळ सोबत घेऊन लढल्या, राम सातपुतेंच्या पत्नीनं जानकरांच्या मुलाला हरवलं