PM Modi in Mumbai : BMC च्या प्रचाराचा नारळ फुटणार, 8 कामाचं आज उद्घाटन

PM Narendra Modi in mumbai for inaugurate many development projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) येत आहेत. मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अनेक विकासकामांचं उद्घाटनं आणि पायाभरणी करणार आहेत. मुंबईबरोबरच पंतप्रधान मोदी हे कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर देखील असणार आहे. अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील […]

Mumbai Tak

मुंबई तक

18 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

follow google news

PM Narendra Modi in mumbai for inaugurate many development projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) येत आहेत. मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अनेक विकासकामांचं उद्घाटनं आणि पायाभरणी करणार आहेत. मुंबईबरोबरच पंतप्रधान मोदी हे कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर देखील असणार आहे. अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, पंतप्रधान मोदींच्या आजच्या दौऱ्याकडे BMC निवडणुकीच्या अनुषंगानेच बघितले जात आहे. पंतप्रधान मोदी आजच्या सभेत प्रचाराचा श्रीगणेशा करू शकतात, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

हे वाचलं का?

सगळ्यात आधी एक नजर पंतप्रधान मोदींच्या मुंबई आणि कर्नाटक दौऱ्यावर:

  • पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारीला मुंबई आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असणार आहेत.

  • कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील

  • दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील

  • दुपारी 2.15च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकी पत्र वितरीत करतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.

  • संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मुंबई इथे विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करतील.

  • संध्याकाळी 6.30च्या सुमारास पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील.

मुंबईत पंतप्रधान मोदी कोणकोणत्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार?

भूमिपूजन

1. 17,182 कोटींचे 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन (वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर) प्रतिदिन क्षमता: 2464 दशलक्ष लिटर, यामुळे 80% लोकसंख्येला लाभ होणार

2. बृहन्मुंबई महापालिकेच्या 3 रुग्णालयांचे 1,108 कोटी खर्चासह बांधकाम व पुनर्विका (गोरेगाव, भांडुप, ओशिवरा) यामुळे 25 लाख गरजूंना लाभ होणार

3. 6,079 कोटी खर्चासह 400 किमी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होणार

4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा 1813 कोटी खर्चासह पुनर्विकास. वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारती हरित प्रमाणित होणार

लोकार्पण

5. मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व-डी. एन. नगर) 6410 कोटी खर्चासह 18.6 किमी मार्गिका आणि 17 स्थानके

6. मेट्रो मार्गिका 7 (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) 6208 कोटी खर्चासह 16.5 किमी मार्गिका आणि 13 स्थानके

7. बृहन्मुंबई मनपाच्या 20 नवीन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण. मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत 147 रक्त चाचण्या, विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला

लाभ वितरण

8. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण, 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतील बीकेसीच्या MMRDA मैदानावर जाहीर सभा देखील पार पडणार आहे. आता या सभेत पंतप्रधान मोदी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभच करणार आहेत. आता यावेळी मोदी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर मोदी कसा निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp