विमानतळापर्यंत जिवंत पोहचलो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आभार सांगा; मोदींनी सुनावलं

मुंबई तक

• 11:39 AM • 05 Jan 2022

पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जात असताना पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. तब्बल 15 ते 20 मिनिटं पंतप्रधान एका उड्डाणपूलावर अडकून पडले. या घटनेमुळे पंतप्रधानांना कार्यक्रम रद्द करून पुन्हा माघारी फिरावे लागले. मात्र, परतताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांवरील नाराजी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबच्या दौऱ्यावर होते. सकाळी बठिंडा येथील विमानतळावर पोहोचल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जात असताना पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. तब्बल 15 ते 20 मिनिटं पंतप्रधान एका उड्डाणपूलावर अडकून पडले. या घटनेमुळे पंतप्रधानांना कार्यक्रम रद्द करून पुन्हा माघारी फिरावे लागले. मात्र, परतताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांवरील नाराजी जाहीर केली.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबच्या दौऱ्यावर होते. सकाळी बठिंडा येथील विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट देणार होते. मात्र, पोहोचण्यापूर्वीच सुरक्षेत मोठी चूक झाली आणि पंतप्रधानांना पुन्हा विमानतळाकडे रवाना व्हावं लागलं.

पंतप्रधान मोदींच्या रस्त्यात आले शेतकरी, सभा करावी लागली रद्द; पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

मात्र, या गोष्टीमुळे पंतप्रधान नाराज झाले. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधला. विमानतळाकडे निघताना पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील अधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवरील नाराजी व्यक्त केली. एएनआयशी बोलताना एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती.

बठिंडा विमानतळापर्यंत पोहचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना आभार सांगा, असं मोदी अधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाल्याचं एका अधिकाऱ्यांने एएनआयला सांगितलं.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेसाठी जाणार होते. फिरोजपूर येथे ही सभा होणार होती. त्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. मात्र, रस्त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधानांचा ताफा अडकला आणि त्यानंतर पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले. यामुळे कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने ही घटना सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर चूक असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

मोदींना का माघारी फिरावं लागलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी बठिंडा येथे पोहोचले. त्यानंतर तेथून पंतप्रधान हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येतील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाणार होते. मात्र, पाऊस आणि दृश्यमानता कमी (poor visibility) असल्याने पंतप्रधानांना 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली. वातावरण आणि दृश्यमानता कायम राहिल्याने पंतप्रधानांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापासून पंतप्रधानांचा ताफा 30 अंतरावर असतानाच मध्ये एक उड्डाणपूल आला. तिथेच रस्त्यात आंदोलकांनी रस्ता रोखलेला होता. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिटं अडकून पडला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे ताफा पुन्हा बठिंडा विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आला.

    follow whatsapp