पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक; म्हणाले…

मुंबई तक

• 06:26 AM • 26 Dec 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशावासियांशी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांची या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ अनेकांना ते काय बोलतील याबद्दल उत्सुकता होती. विविध विषयांना स्पर्श करत आणि वाचन संस्कृती वाढवण्याबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचं (Bhandarkar Oriental Research Institute Pune) कौतुक […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशावासियांशी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांची या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ अनेकांना ते काय बोलतील याबद्दल उत्सुकता होती. विविध विषयांना स्पर्श करत आणि वाचन संस्कृती वाढवण्याबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचं (Bhandarkar Oriental Research Institute Pune) कौतुक केलं.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल देशवासियांशी संवाद साधला. डिजिटल साधणावरील वेळ वाढत असतानाच त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राकडून सुरू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाबद्दल देशवासियांना माहिती दिली.

मोदी म्हणाले, “अलिकडेच माझं लक्ष एका लक्षवेधी प्रयत्नाकडे गेलं. आपली प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांना भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र नावाची संस्था आहे. या संस्थेनं दुसऱ्या देशातील लोकांना महाभारताच्या महत्त्वाचा परिचय करून देण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल की, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू करण्यात आला असला, तरी या अभ्यासक्रमामध्ये जे शिकवलं जातं. ती माहिती गोळा करण्याची सुरूवात 100 वर्षांआधीपासून झाली होती”, असं मोदी ‘मन की बात’मध्ये म्हणाले.

“जेव्हा या संस्थेनं हा अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. लोकांना आपल्या परंपरांच्या विविध पैलूंना चांगल्या पद्धतीन कसं मांडलं जात आहे, हे सांगण्यासाठी मी याची चर्चा करत आहे. सातासमु्द्रापलीकडे असलेल्या लोकांना याचा लाभ कसा घेता येईल, यासाठीही विविध नवीन पद्धतीन अवलंबल्या जात आहेत. जगभरात भारतीय संस्कृती जाणून घेण्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे. वेगवेगळ्या देशातील लोक फक्त आपली संस्कृतीबद्दल जाणून घेण्याबद्दलच उत्सुक नाही, तर ती वाढवण्यासाठीही मदत करत आहेत”, असंही मोदी यांनी सांगितलं.

    follow whatsapp