PM Narendra Modi Nikhil Kamath Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत केलेल्या पॉडकास्टची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, हा त्यांचा पहिलाच पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केलं. पॉडकास्टचा व्हिडिओ रिलीज करण्यापूर्वी, निखिल कामथ यांनी सध्या ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये निखिल पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
ADVERTISEMENT
व्हिडिओमध्ये, निखिल पंतप्रधान मोदींना विचारतात की, जर एखाद्या तरुणाला नेता व्हायचं असेल, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पारखल्या जाऊ शकतात? या प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदी म्हणतात की, चांगले लोक राजकारणात येत राहिले पाहिजेत. असे लोक आले पाहिजेत, जे फक्त महत्त्वाकांक्षा घेऊन नाही, तर ध्येय घेऊन येतात. पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाषण दिलं. तेव्हा मी जाहीरपणे म्हटलं होतं की, 'चुका होतात.' माझ्या बाबतीतही असं घडतं. मी देखील एक माणूस आहे, देव थोडी आहे.
हे ही वाचा >>Nanded : मोबाईल मिळाला नाही म्हणून मुलाचा झाडाला गळफास, खचलेल्या बापानं त्याच दोरीने... नांदेड हादरलं
पॉडकास्टमध्ये, निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना जगात सुरू असलेल्या युद्धाबद्दलही प्रश्न विचारला. जगात काय चाललं आहे याची काळजी आपण करावी का? असा प्रश्न निखिलने पंतप्रधानांना विचारला. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या संकटाच्या काळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की आम्ही तटस्थ नाही. मी सतत सांगत असतो की मी शांततेच्या बाजूने आहोत.'
पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय फरक आहे?
हे ही वाचा >>Kalyan : कल्याण रेल्वे स्टेशनजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तब्बल 13 महिलांची...
या पॉडकास्टमध्ये पुढे निखिल यांनी पंतप्रधान मोदींना विचारलं की, तुमच्या पहिला आणि दुसऱ्या टर्मच्या कार्यकाळात काय फरक होता? या प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिल्या कार्यकाळात लोकांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मीही दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
राजकारण घाणेरडं आहे का?
निखिल कामथ स्वतःबद्दल सांगताना म्हणतात की, जर कुणी दक्षिण भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आणि लहानपणापासूनच मला सांगितलं गेलं की, राजकारण हे एक घाणेरडं ठिकाण आहे, ही गोष्ट आपल्या समाजात इतकी खोलवर रुजली आहे की ती बदलणं खूप कठीण आहे. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही जे म्हणत आहात ते खरं असतं तर आपण आज इथे नसतो.'
एकूणच निखील कामथ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत हे सर्व प्रश्न विचारण्यात आले असून, याचा निवडक भाग सध्या ट्रेलर म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
