Maharashtra Weather : राज्यातील हवामान हे सातत्याने बदलताना दिसते. तापमानात चढ-उतार सुरु असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी थंडीचा प्रभाव कुठेतरी कमी जाणवतो. सकाळी काही भागांत धुक्यासह दुपारनंतर उन्हाची तीव्रता अधिक वाढेल असे दिसून येते. तसेच पुढील काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ढगाळ हवामानाची शक्यता आहे. 31 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोठी बातमी! राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार
कोकण :
कोकण विभागात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह इतर काही परिसरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाचा कोणताही अंदाज नसलून उष्णता जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा जाणवेल. तसेच धुक्याची शक्यता दाट असेल. तसेच हवामान कोरडं राहणार असून सकाळी धुके, नंतर आकाश स्वच्छ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात मुख्यत्वे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या विभागातील छत्रपती संभाजीनगरात दिवसभर आकाश निरभ्र राहणार आहे. सकाळी हलका गारव्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
विदर्भ :
विदर्भात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सकाळी गारवा जाणवेल. नागपूर आणि परिसरात आकाश निरभ्र राहणार आहे. दुपारनंतर उष्णता जाणवेल.
ADVERTISEMENT











