Ajit Pawar Death: काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट दिवस ठरला. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले असून प्रत्येक क्षणाचे LIVE अपडेट्स या बातमीत पाहायला मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
- अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू...
- केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
- थोड्याच वेळात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार...
- अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानात दाखल
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीत दाखल
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री थोड्याच वेळात उपस्थित होणार...
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काहीच वेळात विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कारासाठी दाखल होणार...
- अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
- दादांची अंत्ययात्रा निघताच कार्यकर्त्यांनी फोडला हंबरडा; "अजित दादा अमर रहे", अशा कार्यकर्त्यांच्या घोषणा...
- अजित दादांच्या पार्थिवा शेजारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार यांच्यासह पवार परिवारातील सर्व सदस्य उपस्थित
- प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ अंत्यसंस्कारासाठी दाखल
- काटेवाडी गावातून अजितदादांचे पार्थिव बारामतीच्या दिशेने रवाना...
- पवार कुटुंबावर ओढवलेल्या दु:खद प्रसंगानंतर वडेट्टीवार यांनी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची भेट घेऊन सांत्वन केले.
- काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बारामती इथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे पुणे विमानतळावरून बारामतीकडे रवाना, काही वेळातच ते अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहतील
- अजित पवार यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीतील काटेवाडी गावात सैनिक पोहोचले.
- अजितदादांच्या अंत्यसंस्कार राज ठाकरे काटेवाडीत दाखल
- बारामतीत शरद पवार, सदानंद सुळे अंत्यविधी स्थळी दाखल
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी तयारी सुरू आहे. मान्यवर नेते कार्यक्रम स्थळी जमा होत आहेत.
- काटेवाडीत अजितदादांचा पार्थिव दाखल
- मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव येथे अंत्यसंस्कार
- पवारांच्या काटेवाडी या मूळ गावी अजितदादांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आणण्यात येणार आहे. काटेवाडी येथील सुप्रिया सुळे, अजय देवगन चे बंधू श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT











