BSNL SET 2026: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या फ्रेशर्स उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीकडून भरती जाहीर करण्यात आली आहे. 'बीएसएनएल'ने या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं असून कंपनीत सीनिअर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही पदे टेलीकॉम आणि फायनान्स शाखेत भरली जातील. यासाठी फ्रेशर्स उमेदवार देखील अप्लाय करू शकतात. या भरतीसाठी bsnl.co.in या BSNL च्या अधिकृत वेबसाइटवर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
BSNL च्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्यूटर सायन्स/ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन विषयात बॅचलर्स ऑफ इंजीनिअरिंग/ बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) डिग्री किंवा किमान 60 टक्के गुणांसह फुल टाइम डिग्री असणं आवश्यक आहे.
तसेच, फायनान्स पदासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंसी (CMA) ची डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 15 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा: पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अनारक्षित (General)/ ईडब्ल्यूएस (EWS)/ ओबीसी (सीएल) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ओबीसी (NCL) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 वर्षे आणि एससी (SC)/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्ष (30+5) वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा: मुंबई: परदेशातून आलेल्या महिलेला मुंबईत फसवलं; बनावट पोलिसांनी 66 लाख लुटले, नेमकं प्रकरण काय?
कसा कराल अर्ज?
1. बीएसएनएल (BSNL) च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम https://bsnl.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
2. त्यानंतर, होमपेजवर About Us च्या कॉलममध्ये Carrer सेक्शन मिळेल.
3. आता, जॉब टायटलमध्ये भरतीचं नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि रजिस्ट्रेशनची लिंक मिळेल.
4. रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केल्यानंतर, समोर अॅप्लिकेशन विंडो दिसेल.
5. नंतर, उमेदवार अॅप्लिकेशन विंडोवर जाऊन अर्ज करू शकतात. आधी बेसिक माहितीच्या आधारे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
6. आता, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून अर्ज भरा.
7. अर्ज भरल्यानंतर फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज भरल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्या.
BSNL च्या भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT











