पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

मुंबई तक

• 02:45 AM • 08 Apr 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 1 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आज 8 एप्रिलला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांनी हा डोस घेतला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीचा पहिला डोस त्यांना 1 मार्चला देण्यात आला […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 1 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आज 8 एप्रिलला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात त्यांनी हा डोस घेतला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीचा पहिला डोस त्यांना 1 मार्चला देण्यात आला होता.

हे वाचलं का?

दुसरा डोस घेतल्यानंतर मोदींनी काय ट्विट केलं आहे?

एम्स रूग्णालयात मी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी एक म्हणजे लसीकरण. तुम्ही जर कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पात्र असाल तर जरूर लस घ्या आणि त्यासाठी http://CoWin.gov.in वर नोंदणी करा.

कोरोना रुग्णसंख्येचा वाढता कहर, एप्रिलमध्ये आता सुट्टीच्या दिवशीही होणार लसीकरण

पंतप्रधान मोदींनी कोणती लस घेतली? (PM Modi Which vaccine took?)

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन COVAXIN (Bharat BioTech) लसीचा पहिला डोस 1 मार्चला देण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. ज्याला ज्याला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींनी कुणी टोचली लस? (Who gave it Vaccine to PM Modi?)

राजधानी दिल्लीतील एम्स या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या पुद्द्चेरी येथील रहिवासी असलेल्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना 1 मार्चला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला. यावेळी लस टोचत असतानाचा फोटो देखील पंतप्रधान मोदींनी ट्विट केलाय कोरोनाची ही लस सुरक्षित असून आपण देखील ती घ्यायला हवी असं आवाहन यावेळी मोदींनी केलं होतं. आज त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Corona रोखण्यात आलेलं अपयश काही राज्यं आमच्या माथी मारत आहेत-डॉ. हर्षवर्धन

देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रूग्ण वाढण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशात लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वाधिक लसीकरण झालं आहे. 18 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली होती ती मागणी फेटाळण्यात आली आहे. लसीकरणाचे जे काही निकष आहेत त्यानुसारच लसीकरण करण्यात येतं आहे असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लसींचा साठा संपतो आहे, त्याचा पुरवठा लवकर झाला नाही तर लसीकरण बंद करावं लागेल अशी भीती व्यक्त केली. मात्र केंद्र सरकारने लसींचा पुरवठा करण्यात येईल असं सांगितलं असून सर्वाधिक लसी या महाराष्ट्राला देण्यात आल्या असल्याचंही सांगितलं आहे.

    follow whatsapp