बुलढाण्यात व्यापाऱ्याची तलवारीचे वार करून हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

जका खान, प्रतिनिधी बुलढाणा महाराष्ट्रातल्या बुलढाणा शहरात व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी 16 नोव्हेंबरला रात्री दहा वाजता बुलढाण्यात रात्री एका दुकानावर 10 वाजता सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात दुकान मालकांची त्यांनी हत्या केली आणि हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. बुलढाणा पोलिसांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:31 PM • 25 Nov 2021

follow google news

जका खान, प्रतिनिधी बुलढाणा

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या बुलढाणा शहरात व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी 16 नोव्हेंबरला रात्री दहा वाजता बुलढाण्यात रात्री एका दुकानावर 10 वाजता सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात दुकान मालकांची त्यांनी हत्या केली आणि हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. बुलढाणा पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि मोटरसायकलचा नंबर मिळाला त्याआधारे तिघांना अटक केली आहे.

अटक कऱण्यात आलेल्या तिघांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये आनंद इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे आहे. या दुकानाचे मालक कमलेश पोपट यांनी आपल्या दुकानाचं शटर रात्री दहा वाजता बंद केलं. त्यावेळी कमलेश यांच्या हातात असलेले पैसे ते पिशवीत ठेवत होते. त्याचवेळी दोनजण त्या ठिकाणी आले. एकाच्या हातात तलवार आणि दुसऱ्याच्या हातात पिस्तुल होती. काही कळायच्या आत या दुकानदारावर हल्ला केला आणि त्याच्या हातातली पैशांची थैली घेऊन पळ काढला. हे सगळं प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.

सीसीटीव्ही कॅमेरात हे स्पष्ट दिसत होतं की पैशांची थैली वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसतो आहे. मात्र या दोघांनी त्या व्यापाऱ्यावर हल्ला केला आणि त्याच्या हातातली थैली हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला. तलावारीचे सपासप वार करून त्या व्यापाऱ्याची हत्या केली. एवढंच नाही तर व्यापारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळीही या दोघांनी हिसकावून नेली. दुकानाच्या मालकाने त्याही अवस्थेत फोन करून आपल्यावर हल्ला झाला आहे अशी माहिती दिली होती. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी ही सगळी माहिती दिली आहे.

जेव्हा व्यापाऱ्यावर हल्ला झाला आहे असं कळलं तेव्हा त्याचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले होते. त्यांनी कमलेश पोपट या व्यापाऱ्याला हॉस्पिटलमध्येही दाखल केलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

    follow whatsapp