थंडी संपत नाही तोवरच महाराष्ट्रावर उष्णतेचं संकट, 'या' जिल्ह्यातील लोकांच्या अंगातून वाहणार घामाच्या धारा

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाहीर केला आहे. 16 फेब्रुवारी रोजी राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता जाणवेल, जाणून घ्या हवामानाचा एकूण अंदाज. 

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

16 Feb 2026 (अपडेटेड: 16 Feb 2026, 04:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या अंदाज

point

16 फेब्रुवारी रोजी राज्यात कोरडं हवामान

point

जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाहीर केला आहे. 16 फेब्रुवारी रोजी राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता जाणवेल, जाणून घ्या हवामानाचा एकूण अंदाज.

हे वाचलं का?

 हे ही वाचा : दादांच्या मृत्यूनंतर सूनेत्राताई अ‍ॅक्टिव्ह मोडवर, सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात, अन् कॅबिनेटमधील 3 मोठ्या निर्णयांची चर्चा

कोकण :

कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज वर्तवला. सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या किनारी उष्ण आणि दमट हवामानची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस आणि किमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या भागात हवामान कोरडं राहून उष्णता जाणवेल. पुणे आणि सोलापूरातील तापमानचा अंश हा समानच असेल असा अंदाज आहे. 

मराठवाडा : 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, धाराशिवमध्ये वातावरण उष्ण आणि कोरडे हवामान राहील असा अंदाज आहे. पाण्याची अधिक कमतरता जाणवेल. 

 हे ही वाचा : 'गणेश नाईक यांना खुमखुमी आली असेल तर....', श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज; नेमकं कोणतं आव्हान दिलं?

विदर्भ :  

विदर्भात सर्वाधिक तपमानामुळे उष्णतेत वाढ होईल. अमरावतीसारख्या भागात उन्हाचा चटका अधिक जाणवेल, रात्री देखील उकाडा जाणवेल.