गुजरातमध्ये गेहलोत नापास अन् हिमाचलमध्ये पायलट पास; काँग्रेसमध्ये रंगली तुलनेची चर्चा

मुंबई तक

08 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:36 AM)

धरमशाला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं दणक्यात पुनरागमन केलं आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचत ४० जागा जिंकून काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला. तर भाजपला अवघ्या २५ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाच वातावरण आहे. तर त्याचवेळी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं एक विधान करत या निकालाची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता […]

Mumbaitak
follow google news

धरमशाला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं दणक्यात पुनरागमन केलं आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचत ४० जागा जिंकून काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला. तर भाजपला अवघ्या २५ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाच वातावरण आहे. तर त्याचवेळी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं एक विधान करत या निकालाची तुलना करण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवली असली तरीही गुजरातमध्ये मात्र काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. यावरुन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचे पडद्यामागील थिंक टँक आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यात तुलना केली आहे. ट्विट करत प्रमोद कृष्णम म्हणाले, युवा नेता सचिन पायलट हिमाचलचे तर आमचे अनुभवी नेते अशोक गहलोत गुजरातचे निरीक्षक होते.. बस बाकी मला काहीच बोलायचं नाही.

दरम्यान, कृष्णम यांच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गहलोत विरुद्ध पायलट संघर्षाला धार येण्याची चिन्ह आहेत.

गेहलोत-पायलट संबंध कशामुळे बिघडले?

राजस्थानमध्ये गेहलोत मुख्यमंत्री झाल्यापासूनच गेहलोत-पायलट यांच्यातील संबंध तणावाचे राहिले आहेत. सुरुवातीची अडीच वर्ष संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगतं पायलट यांनी बंड पुकारलं. मात्र ते काही काळातच शांतही झालं. परंतु त्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही.

गेहलोत यांनी पायलट यांच्या नावालाही तीव्र विरोध केला होता. गेहलोत यांनी पायलट यांना गद्दार म्हणतं ते कधीही राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असं म्हटलं होते. गेहलोत म्हणाले होते की, ज्याने बंड केलं आहे आणि ज्याला गद्दार ठरवलं आहे, अशा व्यक्तीला आमदार कसे स्वीकारू शकतात. तो नेता मुख्यमंत्री कसा होणार? अशा व्यक्तीला आमदारही मुख्यमंत्री कसे काय स्वीकारू शकतात? माझ्याकडे पुरावा आहे की राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपये वाटण्यात आले होते.

    follow whatsapp