Kalyan : कल्याण रेल्वे स्टेशनजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तब्बल 13 महिलांची...

ठाणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांना बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आल्याचं डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितलं. घटनास्थळावरून 13 महिलांची सुटका करण्यात आली.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:11 AM • 10 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ चालायचा वेश्याव्यवसाय

point

ठाणे पोलिसांकडून छापेमारी करत कारवाई

point

पोलिसांकडून 13 महिलांची सुटका

Thane Crime News : ठाणे पोलिसांन गुरुवारी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या चार जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या 13 महिलांचीही सुटका केली. तक्रारींच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ छापा टाकला. यावेळी, तीन महिलांसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, परिसरातील एसटी बस स्टॉपच्या मागे उघड्यावर बेकायदेशीरपणे हे  काम सुरू होतं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Pune Crime: पुणेकरांसमोर त्याने घेतला तरुणीचा जीव, एकही आला नाही धावून!

या कारवाईत पोलिसांना बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आल्याचं डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितलं. घटनास्थळावरून 13 महिलांची सुटका करण्यात आली आणि अधिक सुरक्षिततेसाठी त्यांना उल्हासनगर येथील आश्रयगृहात पाठवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे आणि ते किती काळापासून चालवलं जात होतं याचाही तपास केला जात आहे.

हे ही वाचा >> Thane Crime News : सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! खिशातून न विचारता 500 रुपये घेतले म्हणून भावानेच केली धाकट्याची हत्या

सुटका केलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, या महिलांना समुपदेशन आणि सरकारी योजनांद्वारे मदत दिली जाईल. दरम्यान, अशा बेकायदेशीर कारवायांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच राहील, असंही डीसीपी झेंडे यांनी सांगितलं. त्यांनी लोकांना आवाहन केलंय की, जर त्यांना अशा कोणत्याही हालचालींबद्दल माहिती असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांना कळवावं. रॅकेटशी संबंधीत पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

    follow whatsapp