Thane Crime News : सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! खिशातून न विचारता 500 रुपये घेतले म्हणून भावानेच केली धाकट्याची हत्या
या घटनेनंतर आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. आईने दिलेल्या जबाबाच्या आधारे, आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली असून, भारतीय न्यायालयाच्या कलम 103-1 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सख्ख्या भावानेच केला भावाचा खून

500 रुपये घेतले म्हणून आला होता राग

कल्याण परिसरातील धक्कादायक घटना
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीच्या हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता ठाण्यात फक्त 500 रुपयांसाठी आपल्या सख्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या धाकट्या भावाचीच हत्या केल्याचा त्याच्यावर करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री कल्याण परिसरात ही घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा >>Supriya Sule : वाल्मिक कराडवर PMPLA का लावला नाही? ED ची नोटीस येऊनही कारवाई का नाही? सुळेंनी 2022 चं प्रकरण काढलं
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 8 जानेवारीरोजी ही घटना घडली. आपल्या भावाने खिशातून 500 रुपये न विचारता काढून घेतल्यानंतर दारू पिऊन आलेल्या आरोपी सलीम शमीम खानला राग आला. याच रागातून त्यानं थेट आपल्या भावाची हत्या केली. या प्रकरणावरून वाद वाढला आणि आरोपीने आपल्या धाकट्या भावावरच चाकूने वार करून हत्या केली.
हे ही वाचा >>Suresh Dhas: "आका आणि वरिष्ठ आकांच्या जीवावर गांजा, चरस, देशी-विदेशी रिव्हॉल्वर...", सुरेश धसांचं खळबळजनक विधान!
दरम्यान, या घटनेनंतर आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. आईने दिलेल्या जबाबाच्या आधारे, आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली असून, भारतीय न्यायालयाच्या कलम 103-1 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं. क्षुल्लक वाद किंवा संशयावरून नातेसंबंधातील व्यक्तिची हत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी प्रकरणं उघडकीस आली आहेत.