'भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर..' संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

'दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री होणार असं मी ऐकलं आहे. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्याविषयी आम्ही काय बोलणार? पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्यातून सावरला नाही. त्याच्यामुळे अजित पवार यांच्या कुटुंबातला जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय आहे', असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut

Sanjay Raut

मुंबई तक

31 Jan 2026 (अपडेटेड: 31 Jan 2026, 11:12 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर..

point

संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, 'दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री होणार असं मी ऐकलं आहे. शेवटी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्याविषयी आम्ही काय बोलणार? पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्यातून सावरला नाही. त्याच्यामुळे अजित पवार यांच्या कुटुंबातला जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय आहे.' 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, याबाबत मला माहिती नव्हती", शपथविधीच्या आधी शरद पवारांनी केला खुलासा

अमित शहा यांनी निर्णय घेतला असेल

उपमुख्यमंत्री पदाबाबतचा हा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, 'त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ असे राष्ट्रीय नेते आहेत. या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर हा त्यांचा निर्णय आहे.  त्यांचा पक्ष सतेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहेत. अमित शहा यांनी निर्णय हा घेतला असेल.

भाजपच्या गर्भातून आलेली पिल्ले

भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, 'शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट ही भारतीय जनता पक्षाच्या गर्भातून आलेली पिल्ले आहेत. ती अमित शहा यांचे पक्ष आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. हे आता मला बोलायला काही हरकत नाही. हे दोन्ही गट अमित शहा यांनी निर्माण केले. भाजपने महाराष्ट्रातील प्रमुख घराणी फोडली, पक्ष फोडले. त्याच्यामुळे भाजपचा संबंध नाही असं बोलणं म्हणजे लोकांना मूर्ख समजण्यासारखे आहे.'

हे ही वाचा : '12 तारखेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती', सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी शरद पवार काय म्हणाले?

प्रफुल पटेल, तटकरे यांचा संबंध नाही

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, 'सरकार त्यांचं आहे. सरकारमध्ये त्यांचा गट सामील आहे. उपमुख्यमंत्री पदाची जागा दुर्दैवाने रिकामी झाली. त्या पदावर कोणाला नेमायचे हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला. तसेच याबाबत अमित शहा आणि फडणवीस ठरवतील. याच्यामध्ये प्रफुल पटेल आणि तटकरे यांचा काही संबंध असेल मला वाटत नाही.'

    follow whatsapp