KDMC Mayor : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिंदे गटाच्या उमेदवार हर्षाली थविल-चौधरी यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून हा अर्ज बिनविरोध भरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
महापौरपदासाठी शिंदे गटाच्या हर्षाली चौधरी यांचा अर्ज
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या हर्षाली थविल-चौधरी यांनी आज पालिका मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बिनविरोध राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांच्यासह मनसे नेते राजू पाटील हेही उपस्थित होते. महापौर पदाचा अर्ज बिनविरोध झाल्यास पुढील कार्यकाळासाठी महापौर पदाची धुरा हर्षाली थविल-चौधरी यांच्याकडे जाणार आहे.
उपमहापौर पद भाजपकडे
दरम्यान, उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामले यांचे नाव निश्चित करण्यात आले असून महायुतीमध्ये सत्ता वाटपावर एकमत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे केडीएमसीतील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? फडणवीसांसोबत राष्ट्रवादीची बैठक, प्रफुल पटेलांनी सांगितलं...
'महापौरपद बिनविरोध होणार'
आज शिवसेनेकडून हर्षाली चौधरी यांचा अर्ज महापौरपदासाठी भरला आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि राजू पाटील यांचे मी आभार मानतो. येणाऱ्या तीन तारखेल महापौरपद आणि उपमहापौरपद बिनविरोध निवडून येईल अशी मला खात्री आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणल्या. लाडक्या बहिणींदेखील महायुतीला पाठिंबा दिला. महापौरपद मिळाल्यानंतर लाडकी बहीणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार पाहणार आहे.
ADVERTISEMENT











