अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित; प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन

Ajit Pawar Death : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केल्या आहेत.

Ajit Pawar Death

Ajit Pawar Death

मुंबई तक

30 Jan 2026 (अपडेटेड: 30 Jan 2026, 01:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित

point

प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन

Ajit Pawar Death : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केल्या आहेत. त्यांच्यासोबत अजित दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार, चुलत भाऊ राजेंद्र पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष..' संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

'या' ठिकाणी होणार अस्थींचं विसर्जन

आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत. यापैकी एक कलश अजितदादांच्या मूळ गावी काटेवाडी येथील घरी ठेवला जाईल. दोन कलशांमधील अस्थींचे त्रिवेणी संगम प्रयागराज येथे विसर्जन केले जाईल. काही अस्थींचे विसर्जन बारामतीजवळील कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर केले जाईल. तर काही अस्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत दर्शनासाठी पाठवल्या जातील.

हे ही वाचा : चंद्रपूर: काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा फिल्मी प्रयत्न! वडेट्टीवार-धानोरकर गटवादात हिंसक वळण, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

विद्या प्रतिष्ठानच्या परिसरातील झाडांच्या मुळाशीही विसर्जन

अजित पवारांचे झाडांवर विशेष प्रेम होते, त्यामुळे पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर उरलेली रक्षा आज संकलित करुन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरातील जितकी झाडे आहेत, त्यांच्या मुळाशी विखुरली जाईल. पुणे जिल्ह्यात आजपासून वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने अजित दादांच्या निधनानंतर शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

    follow whatsapp