पुणे महापालिकेचे विभाजन : चंद्रकांतदादांची मागणी; फडणवीसांचा पूर्णविराम…

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, असे मत मंत्री आणि पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडले होते. त्यावर कालपासून पुण्यात महापालिकेचे विभाजन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र या चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:40 AM • 02 Sep 2022

follow google news

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, असे मत मंत्री आणि पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडले होते. त्यावर कालपासून पुण्यात महापालिकेचे विभाजन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र या चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांचा पूर्णविराम :

पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढत आहात? जेव्हा विभाजन करायचे आहे तेव्हा बघू. पण राज्य सरकार पुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे, असेही फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे सात आमदार भाजपच्या संपर्कात? देवेंद्र फडणवीस-अशोक चव्हाणांची मुंबईत भेट

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त आहे. पण वाढत्या विस्ताराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचे आता दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. दोन महापालिका करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र कामकाजाच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दोन महापालिका झाल्यास समस्या तातडीने सुटतील. क्षेत्र लहान असेल तर तिथे काम करायला सोपे जाते.

अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट होणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

अशोक चव्हाण भेटीवर फडणवीसांचे भाष्य :

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि आपली कोणतीही भेट झाली नसल्याचे यावेळी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झालेली नाही. गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो आणि ते देखील पोहोचले. मात्र त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज सकाळपासून अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे 7 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे चर्चा आहेत. काल संध्याकाळी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र फडणवीस यांनी या भेटीचे खंडन केले आहे.

    follow whatsapp