Mohan Bhagwat Speech, मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘संघाचा 100 वर्षांचा प्रवास – नवी क्षितिजे’ या विषयावर महत्त्वपूर्ण सत्र पार पडले. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात आज (दि.8) सकाळी 10.30 वाजता झालेल्या या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील दिशा, सामाजिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या काळातील संघाची भूमिका यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मोहन भागवत यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सविस्तरपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्यांना कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले? आणि त्यांनी कोणती उत्तरे दिली सविस्तर जाणून घेऊयात.....
ADVERTISEMENT
समाजात RSS बाबत अनेक भ्रम आहेत. ते कसे दूर करता येतील? संघाचे स्वयंसेवक कोणत्याही परिस्थितीत कसे काम करतात? शाखेतील कामाच्या स्वरुपात वेळेनुसार बदल आणावेत असं वाटतं का? नव्या पिढीसाठी संघाच्या कामात इंग्रजी भाषेचा समावेश केला जावा का?
मोहन भागवत म्हणाले, परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकुल असतेच. परिस्थितीचा जास्त विचार करुन फायदा नाही. आपण उपाय काय आहेत? याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक अशा पद्धतीने विचार करतो. इकडं असं झालं. तिकडं तसं झालं, समोर अडचणी आहेत, पुढे अडचणी आहेत, असा विचार करुन काहीच फायदा नाही. परिस्थिती कशी आहे? हे पाहून मी यामध्ये काय करु शकतो. याचा विचार करायला हवा. संघाचे स्वयंसेवक असाच विचार करतात. जिथे विरोध होता, तिथेही त्यांनी सुरुवात केली. हळूहळू काम उभं करता आलं. त्यांनी परिस्थितीचा विचार केला नाही. नवं काम असेल तर लोकांच्या मनात भ्रम असतात. भ्रम पसरवले देखील जातात. संघाबाबत असं अनेकदा घडलंय. परंतु हे भ्रम तोपर्यंत चालतात, जोपर्यंत सत्य समोर येत नाही. 'जोवरी जोवरी जंबूक करी गर्जना l जवं त्या पंचानना देखिले नाही' असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते. जोपर्यंत वाघ समोर येत नाही. तोपर्यंत ते ओरडत असतात. सत्य समोर आल्यानंतर भ्रम दूर होतात. आपलं काम संस्कारांचं आहे, प्रचाराचं नाही. त्यामुळे प्रचारच्या क्षेत्रात आम्ही मागे राहिलोय. प्रचार करताना प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतात.. प्रचार केला तर प्रसिद्धी वाढते. प्रसिद्धी वाढली तर अहंकार वाढतो. सार्वजनिक जीवनात यापासून बचाव करणे आवश्यक असतं. प्रसिद्धी कमी झाली तरी खराब आहे, जास्त झाली तरी खराब आहे. प्रचार कार्याचा करावा, व्यक्तीचा नाही. ज्याठिकाणी जेवढं आवश्यक त्याठिकाणी तेवढा करावा. असं आपलं काम सुरु आहे, त्यामुळे आपण थोडे मागे आहोत. एका प्रतिष्ठित मासिकाचे संपादक आहेत. ते संघाचे कडवे विरोधक होते. मला भेटायला आले. मी त्यांना जे सर्वांना सांगतो तेच सांगितलं. तरी देखील त्यांचे अनेक प्रश्न कायम होते. मी त्यांना नागपूरच्या तृतीय वर्ष वर्गात दोन दिवस राहाण्यासाठी बोलवले. एक सोडला तर त्यांचे सगळे प्रश्न मिटले. तो प्रश्न अजूनही कायम आहे, सांगितल्यानंतरही विश्वास होत नाही. संघाकडे पैसा कुठून येतो? हा तो प्रश्न आहे. मी त्यांना सांगतो की, संघ चालवण्यासाठी स्वयंसेवक गुरुदक्षिणा देतात. सेवा देण्यासाठी समाजातून मदत घेतो. मात्र, त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचा हा प्रश्न सोडला तरी बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. संघात येऊन पाहा संघ कसा आहे? असं मी नेहमी आवाहन करतो. तुमचे प्रश्न कायम राहतील. मात्र, एक चमचा साखर खाल्ल्यानंतर साखर गोड आहे, हे सांगण्याची आवश्यकता राहात नाही.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, इंग्रजी भाषा संघाच्या कामाची पद्धतीत कधीच येणार नाही. कारण ती भारतीय भाषा नाही. आपल्याला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. हिंदी मातृभाषा आहे, असं म्हणत आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मात्र, त्याने मातृभाषा बदलत नाही. परंतु जिथे इंग्रजी आवश्यक आहे, तिथं आम्ही त्याचा वापर करतो. भाषेशी आपलं भांडण नाही. आम्ही आहोत, तेच आम्हाला राहायचंय. इंग्रजी अशी बोलायला हवी की, इंग्लंडचे लोक तिकिट काढून आपलं भाषण ऐकायला यायला हवेत. अशी इंग्रजी आपल्याला यायला हवी. जिथे इंग्रजीशिवाय आपलं काम करता येणार नाही, तिथं आम्ही इंग्रजी बोलतो. मात्र, आम्ही संघाचं काम इंग्रजीत करणार नाहीत. संघात भारतीय भाषाच चालेल.
संघामध्ये पदाधिकाऱ्याची निवृत्ती कशाच्या आधारे केली जाते? SC, ST समाजातील व्यक्ती सरसंघचालक बनू शकतो का?
मोहन भागवत म्हणाले, संघाचे जनरल सेक्रेटरी आहेत. दत्ताजी होसबाळे हे सध्या ते काम पाहात आहेत. क्षेत्राचे, जिल्ह्यांचे आणि विभागांचे संघचालक याची तीन वर्षातून एकदा निवडणूक होते. यांना निवड करणारा तो सुद्धा स्वयंसेवकांकडून निवडला जातो. 50 स्वयंसेवकांमागे 1 असे प्रांत प्रतिनिधी असतात. 40 प्रांत प्रतिनिधीमागे 1 अखिल भारतीय प्रतिनिधी असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी सरकार्यवाहक आणि क्षेत्र संघचालकांची निवड करतात. त्यांच्यासोबत प्रांतनिधी हे प्रांत, जिल्हा संघचालकांची निवड करतात. बाकी सर्व लोकांची नियुक्ती हे लोक करतात. अपवाद फक्त सरसंघचालकांचा आहे. सरसंघचालक पुढील सरसंघचालकाची निवड करतो. ते श्रद्धेचं स्थान मानलं जातं, तिथे निवडणूक वगैरे होत नाही. त्या पदावर असलेल्या व्यक्तीवर लोकं श्रद्धा ठेवतात. तो व्यक्तीचा मान नाही, पदाचा मान आहे. नियुक्ती अशा पद्धतीने होते, निवृत्ती कधीही होऊ शकते. कामापासून आयुष्यात कधीही निवृत्ती होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारे लोक देखील आहेत. जोपर्यंत शरीर काम करतं तोपर्यंत लोक काम करतात. मात्र, वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंधनाशिवाय काम करायला हवं. संघाकडून अनुमती असेल तर वेगळी गोष्ट आहे. जसा मी आहे, माझं वय 75 पूर्ण आहे. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, माझा झालं आत.. ते म्हणाले, तुम्हाला काय झालंय? फिरत तर आहात. आणखी काम करा. त्यामुळे मी थांबलोय. मी इथं राहावं हा संघाने दिलेला पर्याय आहे, माझा नाही. शिवाय कोणाला निवृत्त करावे लागले, अशी वेळ अजून आलेली नाही. ती येऊ नये अशी इच्छा आहे. संघाचा सरसंघचालक कोण बनावे? कोणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक बनू शकत नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनू शकत नाही. जो हिंदू आहे, तोच बनेल. सरसंघचालक SC, ST समाजातील असला तरी बनू शकतो. आणखी कोणी असेल तरी बनू शकतो. असं काही पाहून आमच्याकडे कार्यकर्त्यांची नियुक्ती होत नाही. जो काम करेल तो होऊ शकतो. पूर्वी संघ छोटा होता. एका वसाहतीत संघाचं काम सुरु झालं. ती ब्राह्मण वसाहत होती. त्यामुळे कधीकाळी संघाचे सगळे पदाधिकारी ब्राह्मण होते. तेव्हा लोकं म्हणत होते की, संघ ब्राह्मणांचा आहे. कारण लोक आपले किती आहेत? हेच पाहातात. मात्र, आता संघाचं काम वाढलंय. आम्ही संघाची वाढ कोणत्या जाती-पातीत करत नाही. भौगोलिक क्षेत्रात करतो. आम्ही त्याप्रमाणे वाढलो तर सगळ्या वसाहती संपर्कात येतात. त्यामुळे पुढील काळात SC, ST समाजातील व्यक्ती सरसंघचालक होणार की नाही? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण ज्याला करायचं आहे, तो विचार करेल. मला पुढील निवडायचा असेल तेव्हा मी विचार करेन. मी विचार करेल की योग्य कोण आहे? तो सर्वांसाठी उपलब्ध असेल का? SC, ST समाजातील असणे, हे अपात्र असल्याप्रमाणे नाही. किंवा ब्राह्मण असणे म्हणजे पात्र आहात, असंही नाही.
मुस्लीम समाजाकडे जाणारे स्वयंसेवक विरोध असताना काम कसं करतात?
एखाद्या गोष्टीला तुम्ही विरोध केला आणि मी देखील विरोध केला तर विरोध सुरुच राहणार आहे. तथागत गौतम बुद्धांना एकाने प्रचंड त्रास दिला. मात्र, ते शांत होते. मग तो व्यक्ती म्हणाला, मी इतकं तुम्हाला बोलत आहे. ,तुम्हाला राग का येत नाही? उत्तर देताना दे म्हणाले, मी तुम्हाला एखादी वस्तू दिली आणि तुम्ही घेतली नाही. तर ती वस्तू कोणाकडे राहिल? तो म्हणाला तुमच्याकडेच राहिल. त्याच पद्धतीने तुम्ही एवढ्या शिव्या दिल्या. मात्र, मी त्या घेतल्याच नाहीत. राग येण्याचं कारणच नाही. काम करण्यासाठी गेलेले स्वयंसेवक सगळ्या गोष्टींची तयारी करतात. विरोध करणारे देखील आपलेच आहेत, हे त्यांना माहिती असतं. पहिल्यांदा आमच्यावर निर्बंध होते. खोटे आरोप करुन बंदी आणली. खूप अन्याय झाला. मात्र, निर्बंध हटवण्यात आल्यानंतर पूज्यनीय गुरुजींनी भाष्य केलं होतं. ते म्हणाले, चुकून दातांमध्ये जीभ येते आणि कापली जाते. त्यामुळे कोणी आपले दात तोडून टाकत नाही. जे झालं ते झालं. आपलाच समाज आहे. आणिबाणीनंतर पूज्यनीय बाळासाहेब म्हणाले, forget and forgive ..कारण कोणीही असलं तरी समाज आपला आहे. त्यामुळे आम्ही याची चिंता करत नाहीत. सुरुवातीला लोकांना समजतं तेव्हा फार विरोध होतो. मारहाण होते, शिवीगाळ केली जाते. मात्र, जेव्हा हे लक्षात येतं की आपल्याकडून भरपूर झालं. मात्र, यांनी काहीच घेतलं नाही. मग ते आपलं बोलणं ऐकतात. ऐकल्यानंतर ते पडताळून पाहातात. पडताळून पाहिल्यानंतर ते म्हणतात यांच्यामध्ये काहीतरी दम आहे. थोडं यांच्या जवळ गेलं पाहिजे. असं करत करत ते आमचे बनतात. ही आमची प्रक्रिया आहे. असचं आम्ही सगळीकडे काम करतो. स्वयंसेवक मुस्लिमांकडे काहीतरी काम करत आहेत. ते असंच काम करतात.
भाषेच्या आधारावर आजही समाजात भेदभाव केला जातो, हिंसा झालेली पाहायला मिळते. हे सगळं कसं दूर केलं पाहिजे? भ्रष्टाचाराला समाज आणि व्यवस्थेपासून कसं दूर करायचं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासाठी कोणते प्रयत्न करतोय?
मुंबईसहित सगळीकडील पूर्ण समाज पाहिला तर भाषाच्या आधारावर भेदभाव आहे, असं नाही. वेग-वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तेव्हा काही लोकांकडून होते. पण सगळेच मराठी लोकं तलवार घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाला घेऊन बाहेर आले, असं नाही. हे सगळं सुरु असताना देखील आप-आपसांतील व्यवहार सुरुच होते. लोकांमध्ये दोस्ती होती. हा एक स्थानिक आजार आहे, त्याला सार्वजनिक करु नये. तो आजार पसरु नये, याची काळजी घ्यावी. एवढा मोठा समाज आहे. प्रत्येक माणूस कसा वागेल? याची गॅरेंटी कोणीच देऊ शकत नाही. या गोष्टींना खतपाणी खालणाऱ्या काही शक्ती आहेत, ते त्यांचं काम करतात. राजकारणात स्वार्थासाठी देखील या गोष्टी केल्या जातात. या गोष्टी पसरल्या जातात. त्याच्या जखमा होऊ देऊ नका. झाल्या तर त्याला मलमपट्टी करा. लवकरात लवकर त्या मिटवा. स्थानिक मुद्दा आहे, तेवढ्यापुरताच मर्यादीत राहावा, ही काळजी बाकीच्या समाजाने घेतली पाहिजे. याचं सरसकटीकरण होऊ नये. यासाठी आपण सर्वांना भेटलं पाहिजे. आपण अन्य भाषिकांच्या घरी गेलं पाहिजे, त्यांना आपल्या घरी बोलावलं पाहिजे. सुख: दु:खात सहभागी झालं पाहिजे. भारताच्या एकतेसाठी आपण उभा राहिलं पाहिजे. गुंडागर्दीचा बंदोबस्त करण्याची ताकद समाजात असली पाहिजे. गुंडागर्दी ही गुंडागर्दी करणारे लोकच करतात. तो समाजाचा दुर्गुण नसतो.
भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन चालतात. संघाच्या स्वयंसेवकांना सांगण्यात आलंय की, त्यांचं पूर्णपणे समर्थन करा. भ्रष्टाचारविरोधी कायदे करण्याच्या विचारासोबत संघ आहे. भ्रष्टाचारी लोकांना उघडं पाडणे, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणारे स्वयंसेवक असतील. हा आमचा लिखित प्रस्ताव आहे. आण्णाजींचं आंदोलन सुरु होतं, तेव्हा हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तिन्ही गोष्टी यामध्ये करण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार व्यवस्थेत नसतो. भ्रष्टाचार माणसाच्या मनात असतो. व्यवस्थेला बिघडवणारे लोक असतात आणि व्यवस्थेत सुधार आणणारे लोक देखील असतात. हे व्यक्तीवर अवलंबून असतं. गोमा-गणेश-पितळी दरवाजा अशी एक कहानी आहे. मजेदार आहे म्हणून सांगतो. शनिवारवाड्याच्या गेटसमोर 16 वर्षांचा मुलगा 9 वर्षांच्या बहिणीला घेऊन बसायचा. त्याच्याकडे गणेशजींचं पितळचं नाणं आणि कुंकूचं द्रव्य असायचं. जो कोणी येईल, त्याला तो म्हणालायचा हे लावा.. ते लावायचे ..कारण गणेशजी विघ्नहर्ता आहेत. सरकारी कामासाठी निघाले की, कागदावर त्याची मुद्रा उमटवायची. एक दिवस गावातील लोक पेशव्यांकडे आले. म्हणाले, तलावाला मंजुरी मिळून तीन वर्ष झाले. मान्सुन आला आणि गेला मात्र तलाव बांधून झाला नाही. आता मान्सुन येणार आहे, आता तरी तलाव बनवा. काम होत नाहीये. पेशव्यांनी त्यांच्या कारभाऱ्यांना बोलावलं. त्यांना विचारलं हे काम का होत नाही? ते म्हणाले, हो मुंजरी तर मिळालीये. मात्र, याचा जो अर्ज आलाय, त्यावर श्री गणेशाची मुद्रा नाहीये. ते म्हणाले गणेशजींची मुद्रा कसले? हा कुठला नियम आहे? ते म्हणाले, मागील काळापासून चालत आलाय. मग या प्रकरणाची सर्व माहिती घेण्यात आली. तर लक्षात आलं की, 16 वर्षांचा मुलगा 9 वर्षांची मुलगी अनाथ झाले होते. पोट भरण्याचं साधन नव्हतं. त्यामुळे त्यांनी सुरु केलंय. सुरुवातीला हे फ्री होतं. या ही मुद्रा लावा. चांगलं वाटतंय म्हणून लोकं ते करत होते. मात्र, त्यानंतर 1 पैसा, 5 पैसा.. असं करुन तो पोट भरतो. त्यानंतर त्याला अटक झाली. दरबारात बोलवण्यात आलं. सांगण्यात आलं की, आमच्या राज्यात भ्रष्टाचार चालणार नाही. आम्ही तुला कडक शिक्षा देऊ.. मग तो म्हणाला, तुम्ही मला शिक्षा देऊ शकता कारण तुम्ही राजा आहात. सर्वशक्तिमान आहात. माझं तर काहीच नाही. माझी ताकद नाही. मात्र, तुम्ही म्हणत आहात भ्रष्टाचार बंद करु, हे तुम्ही करु शकत नाहीत. ती तुमची ताकद नाही. मग राजा म्हणाला, बघू.. तुला एका जंगलात 6 महिने ठेवतो. तिथे कोणी येणार जाणार नाही. तिथं तुम्ही भ्रष्टाचार करुन दाखवा. त्याला जंगलात ठेवण्यात आलं. तिथं झोपडी बनवण्यात आली. सुरक्षेची व्यवस्था केली. दोन वेळेस जेवण दिलं जाणार असल्याचं सांगितलं. जवळ नदी होती. जहाज येत होती. त्याने नदीच्या किनाऱ्यावर उभा राहून जहाज चालवणाऱ्यांना सांगितलं की, सरकारी काम आहे. इथं मला क्वाटर मिळालंय. रोज माझं जेवण येतंय. मला लाटा मोजायचं काम देण्यात आलंय. तुम्ही जहाज चालवता. त्यामुळे लाटा तुटतात. त्याला बंदी आहे. जहाज चालवणारे लोक म्हणाले आमचं पोट कसं भरणार? मग तो म्हणाला, पाच रुपयांचा परवाना काढा. सहा महिने त्याने पोत भरुन परवान्याचे पैसे गोळा केले. आणि पेशव्यांकडे दिले. निर्जन जंगलात राहून मी हे केलं. चाणक्य म्हणालाय, की पाण्यात मासा कधी पाणी पितो हे समजत नाही. तसंच सरकारी कर्मचारी कधी पाणी पितात हे देखील समजत नाही. हे संस्कारांवर आधारीत आहे. ज्यांच्यावर संस्कार आहे, तो असं करणार नाही.
आमच्या घरात 100 वर्षांपासून वकिली आहे. माझे आजोबा सांगायचे की, कोर्ट नुकतेच सुरु झाले होते. कोर्टाची प्रक्रिया त्यावेळी भारतात कोणाला माहिती नव्हती. एक माणूस सरळ कोर्टात आला. तो म्हणाला, महाराज माझ्या मित्राने 10 हजार रुपये घेतलेत. परत करत नाहीयेत. त्याला पण दया आली. त्याने प्रक्रिया न पाळता थेट त्याला बोलावलं. तर तो म्हणाला मी पैसे घेतले नाहीत. एक माणूस सतत म्हणतोय त्याने पैसे घेतलेत. दुसरा म्हणतोय, घेतले नाहीत. न्याय कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला. मग न्यायाधीशाने शिपायाला एक गाय घेऊन ये म्हणून निरोप दिला. त्या माणसाच्या हातात गाईची शेपटी दिली. याला पकड आणि सांग पैसे घेतले नाहीत, असं सांग. अर्धा मिनीट थांबल्यानंतर तो म्हणाला, माफ करा. मी पैसा घेतलाय. तीन महिने अजून द्या मी परत करतो. आता गाईची शेपटी हातात आहे, म्हणून खोटं बोलत नाहीत, असे लोक असल्यास भ्रष्टाचार थांबू शकतो. संस्कार देणे हेच संघाचे काम आहे. खायचं नाही, आणि खाऊ द्यायचं नाही. कामात चोरी करणार नाहीत, असे आमचे कार्यकर्ते आहेत. ते लढतात. याचे कारण त्याचा संस्कार आहे. गरीब असला तरी तो पैसा खाणार नाही. एकाने गुरुदक्षिणा भवनात ठेवली. ती तिथेच पडून राहिली. जमा करायची होती. विभाग प्रचारक प्रवास करुन आले. उद्या हे पैसे घेऊन जिल्हा केंद्रात जमा कर असं सांगण्यात आलं. रात्री, विद्यार्थी भवनात जेवण नव्हत. किती दिवसांपासून? तर तीन दिवसांपासून नव्हतं. तीन दिवसांपासून उपाशी आहात, 2 हजार रुपये इथं पडले आहेत. तो म्हणाला, नाही ती तर गुरु दक्षिणा आहे. ही दानत आहे. पोटात अन्न नाही, पण त्या पैशांना हात लावणार नाहीत. हे संस्कार करण्याचं काम संघ करतो. हा संस्कार वाढला तरच भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळू शकतं.
वन चाईल्ड अॅप्रोचमुळे अनेक प्रांतांमध्ये लोकसंख्या घटत आहे. त्याला संतुलित कसं करावं? भारतात लोकसंख्या विचारात घेऊन अर्थव्यवस्थेत नवीन प्रयोग कसे करावेत?
वन चाईल्ड अॅप्रोच आणि लोकसंख्येचा प्रश्न तुम्ही मला विचारला नाही पाहिजे. गृहस्थांनी विचार केला पाहिजे. मला काहीच माहिती नाही. मात्र, तुमच्या सारख्या लोकांना भेटतो, तेव्हा काही गोष्टी कानावर येतात. त्याच्या आधारे मी सांगतो. डॉक्टर सांगतात, 19 ते 25 वय असतं, या दरम्यान विवाह करायला हवा. तीन मुलांना जन्म द्यायला हवा. तर पालक आणि मुलं आरोग्यदायी राहातात. मानसशास्त्रज्ञ सांगतात, घरात तीन भावंडं असतील तर त्यांच्यातील व्यवहारातून ते इगो मॅनेजमेंट शिकतात. त्याच्यामुळे पुढील काळात त्यांच्या कुटुंबात वाद होत नाहीत. परिवाराचं आरोग्य चांगलं राहातं. लोकसंख्येचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात की, तीनच्या खाली संकट आहे. 2.3 च्या खाली असाल तर तुम्ही उतारावर आहात. आता आपण 2.1 च्या खाली चाललोय. बिहार वगैरे मुळे आपण वाचलोय. अनेक देशांनी प्रयत्न करुन 2.5 वरुन त्यांच्या लोकसंख्येला 3 वर आणलं. देशाची पॉप्युलेशन पॉलिसी 2.1 असं सांगते. गणितात 2.1 राऊंड अप केलं तर 2 होतं. सगळ्या प्रकारचे शास्त्र सांगतात की, कुटुंबात तीन मुलं पाहिजेत. शास्त्र सांगतं मात्र, हा कुटुंबाचा देखील प्रश्न आहे. दोन लोकांचा देखील प्रश्न आहे. पती-पत्नीचा देखील प्रश्न आहे. समाजाचा देखील प्रश्न आहे. याचा विचार करुन काहीतरी केलं पाहिजे. पालन पोषण कसं करणार? हे प्रश्न याच्याशी सुसंगत नाहीत. अमेरिकेतील टाईम मॅनेजमेंट साईनटिस्टचं आत्मकथन आहे. कॉलेजमध्ये त्यांचं प्रेम झालं. दोघांचा विवाह झाला. त्यांनी ठरवलं की 12 मुलं जन्माला घालायची. त्यानंतर त्यांनी 12 मुलं जन्माला देखील घातली. सर्वांना चांगलं शिकवलं, मोठं केलं. त्यावर त्यांनी 'चीपर बाय दी डझन' हे पुस्तक लिहिलंय..त्यावर सिनेमा देखील निघालाय. ते पुस्तक घेऊन तुम्ही वाचा.. त्याच्यामुळे पालन पोषणाबाबत जे बोललं जात त्या गोष्टी तुमच्यासमोरुन दूर होतील. मात्र, विवाहा करायचा नाही. सन्यास घ्यायचाय. संघाचा प्रचारक व्हायचंय किंवा संघाची प्रचारीका व्हायचंय, असं असेल तर ते वेगळंय. विवाह हा केवळ दोन लोकांच्या शारीरीक संबंधाची गोष्ट नाही. विवाहा समाजाचं युनीट असलेल्या फॅमिलाला उत्पन्न करणारं उपकरण आहे. विवाहा हा संस्कार आहे. विवाह करायचा आणि जबाबदार घ्यायची नाही, असं व्हायला नको. विवाह करायला हवा, जबाबदारी पार पाडायला हवी. असंतुलनाची आणखी दोन कारणे आहेत. बर्थ रेट हे याचं तिसरं कारण आहे. पहिलं कारण धर्मांतर आहे. आपल्याकडे मत स्वातंत्र्य आहे. स्वत; कोणी काही निवडत असेल तर त्याच्यावर कोणी हात उचलू शकत नाही. आक्षेपही घेणार नाही. रेव्हरंड नारायण वामन टिळक होते . कोकणस्थ ब्राह्मण होते. मात्र, त्यांना ख्रिश्चन धर्माचा रस्ता माझ्यासाठी योग्य आहे. मग ते ख्रिश्चन बनले. त्याच्या पत्नीला नको होतं. मग ती हिंदूच राहिली. त्यांचा मुलगा देखील हिंदू राहिला. परिवारात वाद झाले नाहीत. मात्र, रेव्हरंड नारायण वामन टिळक चर्चेमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग म्हणू लागले तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आले. ते बाब वेगळी आहे. ते प्रसिद्ध कवी होते. आम्ही पाठ्यपुस्तकात त्यांच्या कविता म्हणायचो. त्यांची ती योग्यता आहे. ते आदरणीय आणि सन्माननीय देखील आहेत. पंरतु जबरदस्ती करुन, लाच देऊन किंवा मजबूर करुन आपल्या झुंडीत ओढणे, हा प्रकार निषेधार्ह आहे. घरवापसी हे त्याचं उत्तर आहे, हे व्हायला पाहिजे. ज्यांना यायचंय, त्यांच्यासाठी जबरदस्ती नसते. हे एक कारण आहे. घुसखोरी ही दुसरी समस्या आहे. घुसखोरीचे प्रकार रोखण्यासाठी सरकारला बरंच काही करायचं आहे. आत्तापर्यंत होत नव्हतं, आता सुरु झालंय. हळूहळू वाढेल. सेन्सस होईल, SIR होणार आहे, त्यातून असे अनेक लोक समोर येत आहेत. जे येथील नागरिक नाहीत, ते आपोआप बाहेर होतील. आपण डिटेक्शनचं काम करु शकतो. जे लोक येतात, त्यांच्या भाषेवरुन सगळं समजतं. आपण त्यांना डिटेक्ट करु. योग्य अधिकाऱ्यांकडे रिपोर्ट द्यावी. आपण रोजगार विदेशी नागरिकांना देणार नाहीत. हिंदू समाजातील लोकं मोठ्या नोकऱ्यांच्या मागे लागले आहेत. तिथं स्पर्धा नाहीत, म्हणून या लोकांचा रोजगार तिथं पक्का होतो. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये आपले लोक पाहिजेत. जे स्वत:ला हिंदू म्हणवत नाहीत, मात्र, या देशाचे असतील तरी त्यांना काम मिळालं पाहिजे. हे आपण करु शकतो. ते करायला देखील पाहिजे. हे दोन कारणं आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चक्क हॉटेलमध्ये सापडल्या मतदान पेट्या, अधिकारी म्हणाला, माझी चूक झाली!; सोलापुरात राष्ट्रवादी आक्रमक
ADVERTISEMENT











