सोलापूर : सख्ख्या काकानेच 5 वर्षाच्या पुतण्याला संपवलं, असं फुटलं बिंग

मुंबई तक

07 Jun 2026 (अपडेटेड: 07 Jun 2026, 09:35 PM)

Solapur crime : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या समर्थ नावाच्या मुलाचा त्याच्याच काकाने गळा आवळून जीव घेतला.

Solapur crime

Solapur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

समर्थ पत्र्यावरून पडल्याचा रचला खोटा बनाव

point

समर्थच्या मानेवर काळे व्रण

point

काकाचं लज्जास्पद कृत्य

Solapur crime : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या समर्थ नावाच्या मुलाचा त्याच्याच काकाने गळा आवळून जीव घेतला. प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी संशयित काका अंकुश परसाप्पा कास्तार (वय 25) याला ताब्यात घेतले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाने आईवर चाकूने हल्ला केला, नंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारत..

समर्थ पत्र्यावरून पडल्याचा रचला खोटा बनाव

समर्थ हा आजी शोभा बगले हिच्यासोबत अंजुटगी येथील बरूर येथे राहत होता. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास काका अंकुशने त्याला घरी बोलावले. आजीला सांगून समर्थ काकाच्या घरी गेला, मात्र तो पुन्हा परतलाच नाही. काही वेळानंतर समर्थला बेशुद्धवस्थेत उचलून आणले आणि तो पत्र्यावरून पडल्याचा खोटा बनाव रचला. 

समर्थच्या मानेवर काळे व्रण

काही वेळानंतर समर्थच्या मानेवर काळे व्रण आढळून आल्याने नातेवाईकांना हत्येचा संशय बळावला. त्यांनी तातडीने समर्थला नजीकच्या रुग्णालयात नेले, परंतु तोवर उशिर झाला होता. या घटनेदरम्यान डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात मृत घोषित केले. 

हे ही वाचा : तरुणी ट्रायलरूममध्ये कपडे बदलत होती, दुकान मालकाच्या मुलानं फोनद्वारे रेकॉर्ड..

संबंधित घटनेची माहिती मंद्रुप पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. शनिवारी संशयित आरोपीने अंकुश कास्तारला ताब्यात घेतले. नंतर त्याची या प्रकरणातून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आजी शोभा बगले यांनी फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.