मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं-राहुल गांधी

मोदी सरकारने देशाचं आणि सर्वसामान्यांच्या घराचं बजेट बिघडवून टाकलं असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. सरकारने सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ केली आहे. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत. या सगळ्यावरुन एक ट्विट करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार ने बजट बिगाड़ दिया-देश और घर, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:12 AM • 06 Feb 2021

follow google news

मोदी सरकारने देशाचं आणि सर्वसामान्यांच्या घराचं बजेट बिघडवून टाकलं असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. सरकारने सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ केली आहे. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत. या सगळ्यावरुन एक ट्विट करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये?

मोदी सरकारने बजट बिगाड दिया, देश और घर दोनों का! असं ट्विट करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुनही सरकारवर टीका केली आहे.

गुरूवार आणि शुक्रवार अशा दोन्ही दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तसंच एलपीजी सिलिंडरही 25 रुपयांनी महाग झाला आहे. याच मुद्द्यावरुनच राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

    follow whatsapp