भाजप खासदार रक्षा खडसे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज

मुंबई तक

• 11:29 AM • 28 Jan 2021

“अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. पण गृहमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकायला नको होती.” रक्षा खडसे, भाजप, खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे भाजपच्याच अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. तो नंतर हटवण्यात आला. मात्र स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख […]

Mumbaitak
follow google news

“अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. पण गृहमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकायला नको होती.”

हे वाचलं का?

रक्षा खडसे, भाजप, खासदार

रक्षा खडसे यांच्या नावापुढे भाजपच्याच अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. तो नंतर हटवण्यात आला. मात्र स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या वेबसाइटच्या स्क्रिनशॉट आक्षेपार्ह वक्तव्यासह पोस्ट केल्यामुळे भाजप खासदार रक्षा खडसे या देशमुख यांच्यावर नाराज झाल्या आहेत. अनिल देशमुख यांनी वेबसाईटवर झालेल्या या उल्लेखाची तातडीने दखल घेतली ही बाब अत्यंत चांगली आहे. पण त्याचवेळी त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे मी नाराज झाले आहे असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

“अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. पण गृहमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकायला नको होती.”

ही गोष्ट फार मोठी करण्यासारखी नाही-

खासदार रक्षा खडसे पुढे म्हणाल्या, “राजकारणात असताना आपल्यासोबत चांगल्या गोष्टी पण घडत असतात आणि काही यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पण घडत असतात. ही गोष्ट घडून गेली आहे. ती फार मोठी करण्यासारखी नाही. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. जो कुणी व्यक्ती यात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते. हा विषय फक्त माझ्यापुरता नाहीये, तर देशात राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या बाबतीत तिला बदनाम करण्याचे कृत्य व्हायला नको” अशी अपेक्षा खासदार खडसेंनी व्यक्त केली.

भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली. याप्रश्नी आता राजकीय वतावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आज दुपारी जळगावात असताना खासदार रक्षा खडसेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेचे स्वागत केले, पण गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ती आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने उघड नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

    follow whatsapp