Ramesh Patil: “आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर”, भाजप आमदारांचं विधान

मुंबई तक

16 Mar 2023 (अपडेटेड: 25 Mar 2023, 12:05 AM)

Ramesh Patil statement On bhushan desai: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात का?, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे. अलिकडेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत मोठं विधान केलं. […]

Mumbaitak
follow google news

Ramesh Patil statement On bhushan desai: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात का?, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे. अलिकडेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत मोठं विधान केलं. या विधानाने विरोधकांना आयत कोलीत मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

भाजपचे विधान परिषदेतील आमदार रमेश पाटील यांनी केलेल्या विधानाने राजकारण तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून विरोधकांकडून मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असताना रमेश पाटील यांनी केलेल्या विधानामुळे भाजप कोंडीत सापडला आहे.

रमेश पाटील काय म्हणाले?

विधान परिषदेत बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भूषण देसाईंबद्दलच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले, “कुणीतरी काल सांगितलं की, एमआयडीसीच्या प्लॉटची 400 कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करत आहे. चांगला न्याय देत आहे म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले.

Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसची सभापती विनंती

रमेश कदम यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ट्विटर हॅण्डलवर रमेश कदम यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Bhushan Desai : ‘मुलाचं शिवसेनेत कोणतचं काम नाही…’, सुभाष देसाई प्रचंड दुखावले

राष्ट्रवादी काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, “सबकी (भ्रष्टजनों की) पसंद ‘निरमा’ (BJP). भाजपच्या निवडून आलेल्या विधानसभेतील आमदारांनी विधान परिषदेत निवडून दिलेले भाजप आमदार रमेश पाटील यांनी मुक्ताफळे उधळून भाजप वॉशिंग मशीनचा खरा चेहरा उघड केला. सभापती यांना विनंती की हे सत्य कथन सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात येऊ नये.”

भूषण देसाईंवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काय केले होते आरोप?

विधानसभेत अतुल भातखळकरांनी भूषण देसाईंवर आरोप केले होते. भातखळकर म्हणाले होते की, “MIDC ची कुठलीही जागा जी मूलत: उद्योगासाठी राखीव असते ती थेट रहिवाशी क्षेत्रात परावर्तित करता येत नाही. उद्योगाआधी तुम्हाला जागा कमर्शिअल करावी लागते आमि मग रहिवासी. पण अडीच वर्षाच्या कालखंडात MIDC महाराष्ट्रातील 4 लाख 14 हजार स्क्वेअर मीटर एवढी जागा, जी औद्योगिक कारणाकरिता राखीव होती ती जागा थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापराकरिता परावर्तित केली. या जागेची मार्केट व्हॅल्यू 3 हजार 190 कोटी आहे. पण कायदा पायदळी तुडवून जमिनीच्या आरक्षणात बदल केला”, असं म्हणत भातखळकर म्हणाले होते.

Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?

कोण आहेत भूषण सुभाष देसाई?, सॉफिटेलला बसून कोणते व्यवहार होत होते?, त्या भूषण देसाईची आणि तत्कालीन उद्योगमंत्र्याची (सुभाष देसाई) चौकशी व्हावी, 20.5.2021 ची 6 ऑर्डर गतीमान सरकार, कोरोनाच्या कालखंडात महसुलाची लूट, SIT नेमून चौकशी करा पैसे मातोश्रीपर्यंत गेले का? असे प्रश्न या प्रकरणात उपस्थित केले गेले होते.

    follow whatsapp