“अमित शाहाला तुम्ही तुरुंगात पाठवलं होतं”; रावसाहेब दानवेंनी संजय राऊतांना दिला सल्ला

मुंबई तक

01 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे संजय राऊतांवर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना (संजय राऊत) ईडीचे समन्स होते. संसदेच्या अधिवेशनाचं […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे संजय राऊतांवर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

हे वाचलं का?

“गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना (संजय राऊत) ईडीचे समन्स होते. संसदेच्या अधिवेशनाचं कारण पुढे करून त्यांनी (संजय राऊत) ईडीकडे चौकशीला जाण्याचं टाळलं. परंतू गुन्हा जेव्हा दाखल होतो, याचा अर्थ कुठले ना कुठले पुरावे ईडीच्या हाती लागले असतील. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जर ते निर्दोष असतील, तर त्यांनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं. राजकीय रंग या गुन्ह्याला देऊ नये,” असा सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांना दिला.

तुम्ही मोदीजींची चौकशी केली; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

“ईडीने त्यांच्यावर जी कारवाई केली आहे, त्या कारवाईला त्यांनी कायदेशीर तोंड द्यावं. या विषयाला उगीच राजकीय रंग देऊ नये. आमच्या काळात ईडीचा गैरवापर असं म्हणत असतील, तर काँग्रेसच्या काळात लालूप्रसाद यादव तुरूंगात गेले होते. सुरेश कलमाडींची चौकशी झाली होती. अमित शाहाला तुम्ही तुरुंगात पाठवलं होतं. मोदीजींची चौकशी तुम्ही केली होती. त्यांच्या काळात चौकशा झाल्या नाहीत, असं थोडी आहे”, असं उत्तर रावसाहेब दानवे यांनी दिलं.

पत्रा चाळ जमीन घोटाळा : संजय राऊत यांना अटक! ईडीची कारवाई, शिवसेनेला मोठा धक्का

“पुरावे असल्याशिवाय ईडी संजय राऊतांवर कारवाई करणार नाही”

“ईडी आणि सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. त्यामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे ही जी कारवाई झाली आहे, ती कुठे न कुठे त्यांना (ईडी) पुरावे मिळाल्याशिवाय अशा प्रकारची कारवाई ईडी करणार नाही, असं मला स्वतःला वाटतं”, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊतांचं नाव कसं आलं?

संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्या काय म्हणाले?

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एका व्हिडीओतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अनेकांना तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांना आज तुरुंगात पाठवलं जात आहे. सत्यमेव जयते”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp