राज्यातील 'या' 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकालाची तारीख एका क्लिकवर

Zilla Parishad elections : मतदानाची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या दिवशी संबंधित 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदार आपला कौल देतील. मतदानानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Zilla Parishad elections

Zilla Parishad elections

मुंबई तक

13 Jan 2026 (अपडेटेड: 13 Jan 2026, 04:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील 'या' 12 जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा

point

मतदान अन् निकालाची तारीख एका क्लिकवर

Zilla Parishad elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. या घोषणेमुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, ग्रामीण भागातील राजकीय तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हे वाचलं का?

अर्ज भरण्याची अन् माघारीची तारीख

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 21 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, ती 27 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल... आता प्रवास अधिक सुरक्षित

मतदान अन् निकालाची तारीख

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार रिंगणात आहेत, हे समोर येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या दिवशी संबंधित 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदार आपला कौल देतील. मतदानानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक ?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर ,छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर  या 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आलीये. 

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पाडली जाईल, असे स्पष्ट केले. आचारसंहिता लागू करण्यात येणार असून, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे. तसेच, मतदान प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही आयोगाने सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! CSMT-कल्याण मार्गावर धावणार 'ही' खास लोकल... आता प्रवास अधिक सुरक्षित

 

 

    follow whatsapp