Annamalai News : विजय बाबर : भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये येऊन एक वादग्रस्त वक्तव्य केलं. 'मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नसून हे आंतरराष्ट्रीय शहर आहे', असं विधान केलं. याच अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून वाद उफळला. यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अण्णामलाईची लुंगी काढणाऱ्याला तब्बल एक लाखांचं बक्षीस देण्यात येईल असं सांगितलं. ते एवढ्यावर न थांबता पुढे म्हणाले की, अण्णामलाई मुंबईत एक पाय ठेवण्याच्या प्रयत्न करशील तर तुझे दोन्ही पाय तोडण्यात येतील आणि जीभ हसडण्यात येईल, असं म्हणत टीका हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अनैतिक संबंध टिकवण्यासाठी महिलेचा खतरनाक प्लान, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, अन् शीर बोअरवेलमध्ये टाकलं
'उठाव लुंगी आणि बजाव पुंगी', अण्णामलाईची लुंगी काढणाऱ्याला लाखाचे बक्षीस'
शरद कोळी यांनी भाजप नेते अण्णामलाई यांच्यावर जहरी टीका केली. त्यांनी मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांच जाहीर निषेध नोंदवला. ते म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राबाबत बोलण्याचा त्यांना कसलाही अधिकार नाही, असा आरोप त्यांनी केला. नंतर ते म्हणाले की, यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नंतर त्यांनी अण्णामलाईंच्या भाषेवर आक्षेप घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या एकेरी उल्लेखावर टीका केली. ते म्हणाले की, 'उठाव लुंगी आणि बजाव पुंगी', अण्णामलाईची लुंगी काढणाऱ्याला लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
हे ही वाचा : तरुणीच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव, मृतदेह कारखाली आला आढळून, अंगावरील कपडे... शेवटी भयंकर घडलं?
या वेळी कोळी यांनी अण्णामलाई यांनी मुंबईत येण्याची भाषा केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला. त्यांच्या वक्तव्यात आक्रमकपणा दिसून आल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT











