तरुणीच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव, मृतदेह कारखाली आला आढळून, अंगावरील कपडे... शेवटी भयंकर घडलं?
Crime News : एका पार्कजवळ तरुणीचा मृतदेह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कारखाली तरुणीचा मृतदेह, तिच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव आणि अंगावरील कपडे...
पीडितेवर लैंगिक अत्याचाराचा संशय
Crime News : नोएडाच्या बीटा-2 येथील एका पार्कजवळ तरुणीचा मृतदेह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांनी तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी सांगितलं की, तरुणी ही तिच्या भावासोबत भाडेतत्त्वाच्या घरात राहत होती आणि नोएडा सेक्टर-60 मध्ये एका कॉल सेटरमध्ये काम करत होती. नंतर रविवारी सकाळी ऑफिसला निघाली असताना, रात्री उशिरापर्यंत ती पुन्हा घरी परतली नाही, तेव्हा तिच्या भावाने अनेक फोन केले होते. पण दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, सध्या पोलीस या प्रकरणाचे गूढ उकलत आहेत.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीतील लोकांचे भविष्य उजळणार, तर 'या' राशींतील लोकांना सावध राहावं लागणार
नेमकं काय घडलं?
वृत्तानुसार, मुलीच्या आईवडिलांचे आधीच निधन झाले होते. मृत तरुणी ही कुटुंबातील मोठी मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृत मुलगी ही सेक्टर 60 मध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, तर तिचा दुसरा भाऊ आग्रा येथे नोकरी करतो. तिचा भाऊ, हा तिच्यासाठी एकमेव आधार होता, पण तिच्याच जाण्यानं कुटुंबात शोक आहे.
कारखाली तरुणीचा मृतदेह, तिच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव आणि अंगावरील कपडे...
नोएडात मुलीसोबत राहणाऱ्या तिच्या धाकट्या भावाने सांगितलं की, त्याची बहीण रविवारी सकाळी कामावर गेली होती. त्या रात्री तिने फोनवर सांगितलं की, ती मेट्रोने निघून गेली आहे, पण त्यानंतर फोन देखील बंद करण्यात आला होता. नंतर भावाने तिला रात्रभर फोनद्वारे संपर्क साधला, पण संपर्क झाला नाही. जेव्हा त्याने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्याला भयंकर धक्का बसला. एका कारखाली त्याच्या बहिणीचा मृतदेह आढळून आला होता. तिची प्रकृती ही खूपच वाईट होती आणि तिच्या नाकातोंडातून रक्त येत होते. तिच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, मृताचे कपडे देखील काढण्यात आले होते.
पीडितेवर लैंगिक अत्याचाराचा संशय
या प्रकरणात घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी मुन्नी म्हणाल्या की, त्या आपल्या मुलाला घेऊन सकाळी शाळेत सोडायला गेल्या होत्या. तिला पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिसला असता. ती घटनास्थळी गेली आणि तिला एका तरुणीचा मृतदेह गाडीखाली पडलेला आढळून आला होता. यामुळे पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.










