Crime news : केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. कांजीरापल्लीजवळील कुवापल्लीमध्ये एका व्यक्तीने महिलेची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. पोलिसांनी सोमवारी मृतांचे नाव शेर्ली मॅथ्यू (वय 40) आणि जॉब झकारिया (वय 29) असल्याचं सांगितलं आहे. शेर्ले कुवापल्लीची रहिवासी होती, तर झकारिया थाझातंगडीची होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणीच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव, मृतदेह कारखाली आला आढळून, अंगावरील कपडे... शेवटी भयंकर घडलं?
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, ही गंभीर घटना रविवारी रात्री घडली. जेव्हा पोलीस आणि शेजारी घटनास्थळी दाखल झाले असता, घरातील दृश्य भयानक होते. जॉब झकारियाचा मृतदजेह हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता, तर शर्ली मॅथ्यूज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी सांगितलं की, जकारियाने प्रथम शर्लीवर हल्ला केला, तेव्हा तिला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे, नंतर स्वत:ला गळफास लावण्यात आला.
दोन्ही पीडितांचे मृतदेह आढळून आले
रविवारी रात्री एका नातेवाईकाने शर्लीला फोन केला असता, ही भयानाक घटना उघडकीस आली. वारंवार फोन करूनही शर्लीने फोन उचलला नाही तेव्हा नातेवाईकाला काही गडबड असल्याची भीती वाटली. पोलिसांनी तात्काळ काळवण्यात आले असता, पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घराची झडती घेतली आणि मागचा दरवाडा उघडा असल्याचं आढळून आला होता. अशातच प्रवेश करताना त्यांनी दोन्ही पीडितांचे मृतदेह आढळून आले होते.
पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले की, शर्ली ही चांगनासेरी परिसरातील रहिवासी होती. तेव्हा काही वर्षापूर्वी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती कुवापल्ली येथील एका घरात राहत होती. सुरुवातीच्या काळात तपासातून असे समोर आले की, जॉब जकारिया हा शर्लीच्या घरी वारंवार येत असे, तसेच दोघांमध्ये वैयक्तिक वाद असल्याचं सांगण्यात आलं होतं. अशातच तपासातून आर्थिक व्यवहारांचे पुरावे देखील उघड करण्यात आले होते.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशीतील लोकांचे भविष्य उजळणार, तर 'या' राशींतील लोकांना सावध राहावं लागणार
'वैयक्तिक वादातून झकारिया यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं...'
याच वैमनस्यातून तसेच काही वैयक्तिक वादातून झकारिया यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूमागील नेमकं कारण आणि वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT











